Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देव आनंद स्टिल रोमांसिंग विथ लाइफ

देव आनंद स्टिल रोमांसिंग विथ लाइफ

वेबदुनिया

IFMIFM
भारतीय चित्रपटसृष्टीत देव आंनद, दिलीप कुमार व राज कपूर या त्रिमूर्तीची अभिनयाची छाप आजही कायम आहे. यापैकी राज कपूर आज आपल्यात नाहीत. या त्रिमूर्तींनी प्रतिभा आणि तीव्र इच्छा शक्तीच्या जोरावर अभिनयाचा एक नवा इतिहास रचला. त्यांच्यानंतरच्या पिढीने त्यांच्या प्रेरणेतूनच अभिनयाचे धडे गिरवले.

यामध्ये शाहरूख खान, अमिताभ बच्चन सारख्या कलाकारांना आपण आज पाहत आहोत. देव आनंदच्या चित्रपट कारकीर्दीचा पट सहा दशकाहूनही प्रदिर्घ आहे. एवढा मोठा कालखंड एखादा इतिहास घडविण्यासाठी खूप आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आत्मचरित्र 'रोमांसिंग वुईथ लाइफ' प्रकाशित होत आहे. त्याद्वारे हिंदी चित्रपटाच्या इतिहासाचा एक शिलालेख आपल्यासमोर मांडला जात आहे. मग चला! तर आपण देव आनंदच्या जीवनातील काही गमतीदार क्षण पाहू या!

आशावादी चित्रपट
देव आनंदच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर मनोरंजन आणि केवळ मनोरंजनाचा वर्षाव केला. गाणे, संगित, जीवनानंद आणि एक आशावादी दृष्टीकोनाची झरा त्यातून पाझरतो. त्यांनी आपले चारित्र्य, पेहराव आणि लकबींच्या आधारे भारतीय युवकांना स्मार्ट राहण्याचे शिकविले. युवकांना त्यांचे खूप आकर्षण आहे. त्यांनी आपल्या चित्रपटात नेहमी नवीन नायिकांना संधी दिली आणि बॉलिवुडमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले.

जो भी प्यार से मिला
देव आनंदने फॅशनचे अनेक नवीन पैलू निर्माण केले.
webdunia
FCFC
प्रभात फिल्म कंपनीच्या 'हम एक है' या चित्रपटात ते धोती-कुर्ता घालून पडद्यावर वावरले. मात्र, लवकरच त्यांनी विदेशी राहणीमान धारण केले. डोक्यावर विभिन्न आकाराच्या टोप्या, गळ्यात लटकलेला स्कार्प, केसात फुगे, शर्टचे वरचे बटन कायम बंद असलेले, हातात हंटर, खांदे वाकून चालणारे आणि लांब हाताने निरभ्र आकाशाखाली हिरव्यागार निर्सगात किंवा रस्त्यावर आपल्या चंचल नायिकेच्या पाठीमागे गाणे गुणगुणत देव आंनद युवकांना आकर्षित करत असत.

हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलो, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, किंवा ऑंचल में क्या जी, रूपहला बादल। बादल में क्या जी, अजब-सी हलचल यासारख्या बेधुंद करणार्‍या गाण्यांमधून देव आंनदची चुळबुळ प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली.

webdunia
FCFC
हर फिक्र को धुए में उडाते चल गए
देव आनंदचे सहाबहार राहण्याचे आणि आजपर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रीय राहण्याचे अनेक कारणे आहेत. अभिनयासाठी आवश्यक असेल तेवढेच सिगरेट त्यांनी ओढले. औषधाप्रमाणे मद्यप्राशान केले. फक्त एकच पॅक तोही पार्टीत आलेल्या पाहुण्यांचा आदर ठेवण्यासाठी घेतला. अशोक कुमार उर्फ दादामुनीचे ते शिष्य होते. त्यामुळे आरोग्याविषयी ते नेहमी जागरूक राहीले.

त्यांनी चित्रपटांमधून जो पैसा कमावला होता तो पुन्हा चित्रपटासाठीच लावला. आपले भाऊ चेतन आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली.

मोठ्या भावाने आपली वेगळी निर्मिती संस्था स्थापल्याव
webdunia
FCFC
त्यांनी लहान भावाला (विजय) घेवून 'तेरे घर के सामने' किंवा 'गाइड' सारखे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारीत 'गाइड' ने एका नवीन वादाला जन्म देवून विचारमंथन घडवून आणले. ''आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है।''

एँटी हीरोची लोकप्रिय प्रतिमा
बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत' (1943) या हिंदी चित्रपटात प्रथमच चरित्र नायकाच्या रूपात अशोक कुमार पडद्यावर आले होते. या चित्रपटाने कलकत्त्याच्या रॉक्सी चित्रपटगृहात जवळपास चार वर्षे तुफान गर्दी खेचली होती. यातील कवी प्रदीप यांचे 'दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है।' हे गाणे स्वांतत्र्याचे गीत बनले होते.

webdunia
FCFC
देव आनंदच्या चित्रपटाचे कथानक नेहमी गुन्हेगारी भोवती गुंफलेले असायचे. 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कालापानी' या चित्रपटासाठी देव आनंद यांना उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. 1966 मध्ये 'गाइड' ने दुसर्‍यांदा त्यांना तो पुरस्कार मिळवून दिला. ज्वेलथीफ, जॉनी मेरा नाम, हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटांचा काळ हा देव आनंदच्या जीवनातील सुवर्णकाळ मानला जातो. प्रसार भारतीला एकदा मुलाखत देताना त्यांनी सांगितले होते की, यशस्वीतेचा आनंद आणि अपयशाचे दु:ख साजरे केल्याशिवाय मी आपले काम सातत्याने करत आहे. यापाठीमागे त्यांचा आत्मविश्वास आणि सक्रीयता दिसून येते.

जाएँ तो जाएँ कहाँ
26 सप्टेंबर 1923 मध्ये पंजाबमधील गुरूदासपुर येथे जन्मलेल्या देव आनंदचे वडील पिशोरीमल एक नामवंत वकील होते. ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनी अनेक वेळा तुरूंगवास भोगला होता. देव आनंद त्यांचे पाचवे रत्न होते. 1940 मध्ये आईचा मृत्यू झाल्यामुळे नऊ भावडांना आपला सांभाळ स्वत: च करावा लागला.

लहानपणी अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागले. रद्दीच्या दुकानातून बाबूराब पटेलद्वारा संपादीत फिल्म इंडियाचे जुने अंक वाचून देव आनंदला चित्रपटाची आवड निर्माण झाली. त्यासाठी अनेक वेळा मित्रांसोबत चित्रपटही पाहत असत. 'बंधन' चित्रपटाच्या कामानिमित्त अशोक कुमार गुरूदासपुरला आले होते तेव्हा देव आनंद गर्दीतून दादामुनीला एकटक पाहत राहीले होते.

webdunia
FCFC
अशोक कुमार यांना मिळणारे लोकांचे प्रेम पाहून देव आनंदने मनात विचार केला होता की बी.ए. नंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात गेलो नाही तर अभिनेता बनने पसंद करेल. वडीलांनी मुंबईला जाण्यास मनाई केल्यानंतर आपल्या भावासोबत फ्रंटियार मेलने 1943 मध्ये मुंबईला पोहचले. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त तीस रूपये होते. ह्याच तीस रूपयाने त्यांच्या जीवनाला रंग आणला आणि 'जाएँ तो जाएँ कहाँ' वाल्या देव आनंदला फिल्मी दुनियेत आश्रय मिळाला.

webdunia
FCFC
धोब्याची गमतीदार चूक
प्रभात फिल्म कंपनीत काम करताना धोब्याकडून झालेल्या एका चुकीमुळे देव साहेबांची भेट अशा व्यक्तीशी झाली की पुढे जावून ती व्यक्ती त्यांची खास मित्र बनली. ती व्यक्ती म्हणजे दुसरे कुणी नसून गुरूदत्त होय. ज्यांनी प्यासा, कागज के फूल, साहब बीबी आणि गुलाब यासारखे क्लासिक चित्रपट निर्माण करून जगात आपले नाव कमावले होते.

गुरूदत्त कर्नाटकातील शांती निकेतनमार्गे उदयशंकरच्या अल्मोडा येथे असलेल्या बेले ग्रुपमधून नृत्यदिग्दर्शनाचे शिक्षण घेवून प्रभातमध्ये आले होते. एकदा धोब्याच्या चुकीमुळे दोघांचे शर्ट एकमेकांना दिले गेले. दोघेही शर्ट बदलण्यासाठी दुकानावर गेले असता योगायोगाने दोघांची भेट दुकानावर झाली आणि ते दोघे एकमेकांचे आयुष्यभरासाठी खास मित्र बनले.

दोघांनीही एकमेकांना वचन दिले की दोघांपैकी जो कुणी अगोदर निर्मता-दिग्दर्शक बनेल तो दुसर्‍याला चित्रपटात ब्रेक देईल. त्यानंतर 1951-52 मध्ये देव आनंदने आपले बॅनर नवनिकेतच्या माध्यमातुन 'बाजी' आणि 'जाल' चित्रपटाचे दिग्दर्शन गुरूदत्तने केले. अशा प्रकारे गुरूदत्तने 'सीआयडी' चित्रपटात शकीलाबरोबर देव आनंदला प्रेक्षकांसमोर सादर केले.

चुप-चुप खडे हो जरूर कोई बात है
प्रत्येक अभिनेत्याचे एखाद्या नायिकेसोबत प्रेमसंबंध असण
webdunia
FCFC
ही चित्रपटसृष्टीतील सामान्य बाब आहे. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विद्या' या चित्रपटात सुरय्याने भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची मना जुळली. 1951 पर्यंत दोघांनी सलग सात चित्रपटात एकमेकांबरोबर काम केले. प्रत्येकाच्या तोंडी या दोघांच्या प्रेमाची चर्चा होती.

सुरय्याची आजी कट्टर मुस्लिम असल्यामुळे आणि 1947 च्या भारत-पाक फाळणीनंतर हिंदू-मुस्लिम संबंधात तणाव निर्माण झाला होता. समाजाच्या कट्टर विरोधामुळे ते लग्नबंधनात अडकू शकले नाहीत. मात्र, सुरैयाने आपल्या प्रेमासाठी आयुष्यभर लग्न केले नाही. देव आनंदशिवाय दुसर्‍या कुणालाही स्वप्नात बघितले नाही.

पाकमधून आलेल्या वरातीस तीने चक्क परत पाठवले. देव आनंदने आपल्या प्रेमाचा अनेकदा उल्लेख केला. त्यानंतर 'टॅक्सी ड्राइव्हर' मधील नायिका मोना उर्फ कल्पना कार्तिकशी देव आनंदचे चित्रपटाच्या सेटवर दहा मिनिटात लग्न झाले. सेटवर उपस्थित असलेला त्यांचा भाऊ चेतनला या लग्नाची भनकही लागली नाही.

webdunia
FCFC
गाता रहे मेरा दिल
स्वातंत्र्यानंतर चित्रपटात समूहाने काम करण्याची सुरवात राजकपूरने केली होती. त्यांनी लता मंगेशकर, शैलेंद्र, हसरत जयपुरी, शंकर-जयकिशन यांना आपल्या समूहात सामिल करून घेतले. दुसरीकडे नौशाद-शकील यांची जोडी होती. साहिर-एस. डी. बर्मन यांची जुगलबंदी अनेक वर्ष चालू होती. देव आनंदने गुरूदत्त, गीता बाली, किशोर कुमार, एसडी बर्मन, साहिरला आपल्या समूहाचा सदस्य बनविले होते. शंकर-जयकिशनसमोर फक्त संगितकार दादा बर्मनला यशस्वीता आणि लोकप्रियता मिळाली होती.

जाता, जाता
देव आनंदच्या जीवनातील काही लहान-मोठे चढ-उतार:
1. राजकपूर सारख्या खास मित्रासोबत देव आनंदने एकाही चित्रपटात काम केले नाही.
2. दिलीपकुमारसोबत देव आनंदने केवळ इंन्सानियत या चित्रपटात काम केले.
3. किशोर कुमारचा आवाज उधार घेवून देव आनंदने जीवनाचे सर्वाच्च शिखर गाठले.
4. 'आनंद' चित्रपटात त्यांनी आपला मुलगा सुनिलला संधी दिली होती परंतु तो यशस्वी होवू शकला नाही.
5. देव आनंद कधीच कुणाला पार्टी देत नाहीत आणि दुसर्‍याच्या पार्टीत खूपच कमी वेळा जातात.
6. देव आनंदने नायिका सोडून अनेक मुलींना आपल्या चित्रपटात संधी दिली आहे.







Share this Story:

Follow Webdunia marathi