Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनीषा शांततेच्या शोधात

मनीषा शांततेच्या शोधात
IFM
मनीषा कोईराचे डोके सध्या चांगलेच उठलेय म्हणून ती शांततेच्या शोधात आहे. त्यासाठी तिने एक योगाचा वर्ग जॉईन केला आहे. मनीषाची चित्रपट करिअर जवळपास संपल्यातच जमा आहे. बड्या बॅनरच्या चित्रपटात फारसे न दिसणार्‍या मनिषाचे बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांमध्ये अधूनमधून दर्शन होते इतकेच.

प्रेमाच्या बाबतीतही ती कमनशिबीच ठरली. तिच्या प्रियकरांची यादी कदाचित तिलाच आठवत नसेल, एवढी मोठी होती. प्रेमात अपयशी ठरलेली मनीषा हे दु:ख विसरण्यासाठी पूर्णतः: दारूच्या आहारी गेली. त्यातही शांती न मिळाल्याने आता तिने अध्यात्म आणि योगाचा आधार घेतला आहे.

मनीषा एकेकाळी गुणवान अभिनेत्रींमध्ये गणली जायची. सुभाष घईंच्या 'सौदागर' या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करुन काही चित्रपटांमध्ये चांगला अभिनयही केला. गोविंदाने तर तिची तुलना मीनाकुमारीशी केली होती.

गुणवत्ता असतानाही कामाबद्दल अतिशय बेजबाबदार असणार्‍या मनीषाला मात्र लांबचा पल्ला गाठता आला नाही. तिच्यामुळे अनेक चित्रपटांच्या शूटिंगला पर्यायाने चित्रपट प्रदर्शित व्हायला वेळ लागायचा. तिच्या वागणुकीमुळे निर्मात्यांना बराच त्रास सहन करावा लागला. विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साळी यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी तिच्यासोबत एकदा काम केल्यानंतर तिला आपल्या इतर चित्रपटांमध्ये न घेणेच पसंत केले. त्यामुळे कामाबद्दल व्यवहारी असणार्‍या समकालीन अभिनेत्री तिच्या कितीतरी पुढे निघून गेल्या.

मनीषाच्या 'पिण्याबाबत' अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. रात्रभर जागून ड्रिंक घेऊन दुसर्‍या दिवशी शूटिंगवर उशिरा जाणे, त्यातही तिचे सुजलेले डोळे पाहून दिग्दर्शक तिच्यावर नाराज असायचे.

बड्या निर्माता-दिग्दर्शकांनी तिला घेणे बंद केल्यावर 'एक छोटी सी लव स्टोरी', 'तुम', आणि 'चाहत :एक नशा' यासारखे अपयशी चित्रपट तिने केले. निर्माता बनलेल्या मनिषाने 'पैसा वसूल' करण्याऐवजी पैसा गमावला.

आता मात्र ती परत एकदा जोरदार पुनरागमन करू इच्छित आहे. पण इच्छा असली तरी स्वतःला सुधारायच्या प्रवासावर सातत्यही हवे.

Share this Story:

Follow Webdunia marathi