Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाढदिवसाच्या शुभेच्छा- संजय दत्त (स्लाइड शो)

वाढदिवसाच्या शुभेच्छा- संजय दत्त (स्लाइड शो)
संजय दत्तच्या फिल्मी कारकिर्दीची सुरवात 'रॉकी'पासून (१९८१) झाली. नकारात्मक भूमिकेत तो नेहमीच प्रभावी वाटला. (कदाचित त्याच्या आयुष्याशी ते कुठेतरी समांतर असावे.) वादविवादात अडकण्याची त्याला जुनी खोड आहे. त्यापासून तो दूर राहिला असता तर कदाचित आज तो कुठल्या कुठे पोहोचला असता. २९ जुलै १९५९ मध्ये त्याचा जन्म झाला. म्हणजे आज त्याचा वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण माहिती घेऊया त्याच्या पाच चांगल्या चित्रपटांची.
IFM

लगे रहो मुन्नाभाई (२००६)

मुन्नाभाईच्या मालिकेतील हा दुसरा चित्रपट. यात मुन्नाभाई व गांधीजी यांचे असे काही अद्भूत नाते दिग्दर्शक राजकुमार हिराणीने विणले की त्याने एक इतिहास रचला. 'टपोरी' मुन्नाभाईवर गांधीजींच्या विचारांचा असा काही परिणाम होतो की तोही त्यांच्या विचारांवर चालू लागतो. आजच्या काळात गांधीजींचे विचार कसे आवश्यक आहे, हेच त्याच्या भूमिकेने अधोरेखित केले. असे म्हणतात, की गांधीजींच्या विचारांचा परिणाम संजूबाबावरही काही प्रमाणात झाला. खरे खोटे देव जाणे.

webdunia
IFMIFM

मुन्नाभाई एमबीबीएस (२००३)


या चित्रपटाने संजूबाबाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्याचे नावच मुन्नाभाई पडले. 'गुंड' मुलगा डॉक्टर बनविण्याचा कसा प्रयत्न करतो त्या निमित्ताने एकूणच या व्यवसायाकडे मार्मिक दृष्टिकोनातून टाकलेली नजर असे या चित्रपटाचे स्वरूप होते. यात संजयचा अभिनय अगदी नैसर्गिक होता. आधी ही भूमिका शाहरूख खान करणार होता. पण पाठीच्या दुखण्यामुळे त्याने नकार दिला. आणि संजूबाबाचे 'भाग्य' अचानक उघडले.

webdunia
IFMIFM

वास्तव (१९९९)

'वास्तव' या महेश मांजरेकरच्या चित्रपटातील रघुनाथ नामदेव शिवलकरची भूमिका संजूबाबाने अशी काही केली की पुरस्कारांची रास त्याच्या पायाशी येऊन पडली. मुंबईतील टोळीयुद्धावर आधारीत हा चित्रपट होता. पावभाजीचा स्टॉल लावणारा युवक टोळीयुद्धात कसा खेचला जातो याचे भेदक चित्रण यात होते. टोळीयुद्धात अडकलेल्या युवकाला शेवटी त्याची आईच मृत्यूदंड देते, हा शेवटही अत्यंत प्रभावी ठरला होता. नकारात्मक नायकाच्या भूमिकेत संजूबाबा जरा जास्तच खुलतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

webdunia
IFMIFM

सडक (१९९१)

'सडक' हा संजूबाबाच्या कारकिर्दीतील एक वेगळा चित्रपट होता. महेश भट यांनी संजूबाबाला घेऊन हा चित्रपट बनविला. पण ती एक मोठी 'रिस्क' होती. कारण संजूचे अनेक चित्रपट तेव्हा आपटले होते. पण 'सडक' जबरदस्त हिट ठरला. एवढा की 'स्टार' कलावंत म्हणून त्याचे नाव पुढे आले. या चित्रपटातील गाणीही अतिशय लोकप्रिय झाली आणि सदाशिव अमरापूरकरांची 'महाराणी'ही सगळ्यांच्या लक्षात राहिली.

webdunia
IFMIFM

नाम (१९८६)

'नाम' हा चित्रपट राजेंद्र कुमारने आपला मुलगा कुमार गौरवला पुढे आणण्यासाठी केला. त्यात संजयची भूमिका नकारात्मक होती. त्यावेळी अशा भूमिका करायला नायक नकार देत असत. पण संजूबाबाने ही भूमिका केली. त्याचा प्रभाव एवढा पडला की लोक कुमार गौरवला विसरले आणि संजूबाबाला मात्र त्यांनी कायम लक्षात ठेवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi