Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय गुप्ता चक्क बदलतोय!

संजय गुप्ता चक्क बदलतोय!

वेबदुनिया

IFMIFM
संजय गुप्ता आतिश हा चित्रपट बनवत असताना शूटींगच्या काळात त्यांची संजय दत्तशी मैत्री झाली. संजय गुप्ताला हॉलीवूडचे प्रचंड आकर्षण. त्यामुळेच तसले स्टायलिश चित्रपट तयार करायला त्याला फार आवडतात. त्याची ही आवड संजय दत्तशी मैत्री जुळण्यास कारण ठरली.

संजयच्या मैत्रीचा मोठा फायदा संजय गुप्ताला झाला. त्यामुळे अनेक फ्लॉप चित्रपट बनवूनही हा पठ्ठ्या अजून बॉलीवूडमध्ये टिकून आहे. चित्रपटाचे मार्केटिंग करणे कुणी त्याच्याकडून शिकावे. त्याचवेळी बड्या चढ्या गप्पा मारण्यात त्याचा हातखंडा आहे.

त्याच्या बाबतीत एक किस्सा आहे. एकदा म्हणे विवेक ओबेरॉयने त्याच्याबरोबर चित्रपट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळी विवेकचे चित्रपट पडत होते. त्यामुळे तो फ्लॉप स्टार होता. संजयने त्याला सांगितलं, की आपण नक्की दोघं मिळून चित्रपट करू. फक्त विवेकने त्याला काम देत असल्याबद्दल पैसा द्यावा. आता बोला.

आतिश, जंग, कॉंटे, हमेशा आणि जिंदा हे संजयचं फिल्मी रेकॉर्ड. सगळे पडेल चित्रपट. पण तो असे काही दाखवतो की महान दिग्दर्शक वगैरे जे असतात ते आपणच. कदाचित म्हणूनच की काय अनेक बडे स्टार त्याच्याबरोबर काम करायला उत्सूक असतात. कारण त्याच्या स्टायलिश सादरीकरणाची लोकांना भुरळ पडत असावी.

त्याच्या चित्रपटात स्टाईल सोडून काहीच नसतं. सगळ्या चित्रपटांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असते. त्याचे उदात्तीकरण करून तो सगळे सादरीकरण करतो. आतिशपासून जिंदापर्यंत सगळे चित्रपट केवळ स्टाईलबाज होते. त्यात बाकी काहीही नव्हते. ज्यांना हॉलीवूडी इंग्रजी चित्रपट कळत नाहीत, पण आवडतात. त्यांच्यासाठी संजय गुप्ता हा पर्याय बनला आहे. म्हणूनच त्याच्या चित्रपटांचाही एक विशिष्ट चाहता वर्ग आहे.

संजय गुप्ताची स्वप्ने नेहमीच मोठी होती. म्हणूनच आता आपल्या व्हाईट फिदर या कंपनीला मोठं करण्याच्या प्रयत्नाला लागला आहे. यशराज फिल्म्ससारखं आपल्याही कंपनीसारखं नाव व्हावं ही त्याची मनीषा आहे. त्यासाठी तो एकावेळी अनेक चित्रपटांचे काम करतो आहे. स्टाईलला सोडचिट्ठी देऊन कथेवर तो भर देऊ लागला आहे. म्हणूनच आता त्याचा दस कहानियॉं हा वेगळ्या पद्धतीचा चित्रपट येतो आहे.

संजयच्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटांची कल्पना होती. त्याने दहा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन हा चित्रपट बनवला आहे. संजयच्या चित्रपटांच्या अगदी वेगळ्या प्रकारचे चित्रपट करणारे अभिनेते त्याने या दस कहानियॉंच्या निमित्ताने आपल्या तंबूत आणले आहेत. नसरूद्दीन शहा, शबाना आझमी, नाना पाटेकर किंवा मेघना गुलजार हे संजय गुप्तासारख्याच्या चित्रपटात काम करतील याचा विचारही कधी कुणी केला नसता. पण ते शक्य झाले आहे.

संजय गुप्ता म्हणे गुलजार यांचा फॅन आहे. त्यांचे चित्रपट त्याला खूप आवडतात.( मग त्यांच्यापासून काही तरी शिक ना. बाबा!) दस कहानियॉंतील प्रत्येक कवितेसाठी गुलजार यांनी एक कविता लिहिली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या ऑडियो सीडीसोबत या कविताही प्रकाशित करण्यात आल्या.

संजयच्या या विचारांमध्ये एकदम बदल व्हायचे कारण त्याला झालेला अपघात असावा असे बोलले जाते. कारण या अपघाताने तो अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होता. या काळात त्याला विचार करण्यासाठी बराच वेळ मिळाला. कदाचित त्यामुळेच त्याच्या विचारांमध्ये बदल घडला असावा.

चित्रपटांप्रमाणेच संजय गुप्ताचे जीवनही स्टायलिश आहे. लार्जर दॅन लाईफचे त्याला फार आकर्षण आहे. समीरा रेड्डीपासून दीया मिर्झापर्यंत अनेकींशी त्याचे नाव घेतले जाते. दस कहानियॉं प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईहून केरळपर्यंत बाईकने जाण्याचा त्याचा इरादा आहे. त्याच्या मागे त्याचा सगळा स्टाफ म्हणे कारने येणार

Share this Story:

Follow Webdunia marathi