Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समर्थ अभिनयाची वारसदारः काजोल

- विकास शिरपूरकर

समर्थ अभिनयाची वारसदारः काजोल

वेबदुनिया

IFM
घरातूनच वारसा घेउन अभिनयाच्‍या क्षेत्रात उतरलेली एक काळयासावळया रंगाची तरुणी बॉलीवूडमध्‍ये रुढ असलेल्‍या अर्थाने फारशी सुंदर नसूनही केवळ अभिनयाच्‍या बळावर हीट चित्रपटांसाठीचे आगळेवेगळे रसायन ठरली. ही कथा आहे, 'दिलवाले दुल्‍हनीया ले जायेंगे' मधल्‍या सिमरनची... ही कथा आहे 'कुछ कुछ होता है' या सुपरडूपर हीट चित्रपटाच्‍या अंजलीची.... ही कथा आहे, आख्‍ख्‍या बॉलीवूडला आपल्‍या काळया-काळया डोळयांनी घायाळ करणा-या काजोल मुखर्जीची. होय तुम्‍हा-आम्‍हाला परिचित असलेल्‍या आत्‍ताच्‍या काजोल अजय देवगणची.

सध्‍याच्‍या काळात आघाडीच्‍या आणि नामांकित अभिनेत्रींमध्‍ये समावेश होत असलेल्‍या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून स्थिरावले आहे. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्‍मफेअर पुरस्‍कार पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्‍या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच नव्‍हे तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्‍यांच्‍या काळातील गाजलेले कलावंत. अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार यांच्‍या कुटुंबाशही काजोलचे वडीलांकडून नाते आहे.

आई तनुजा, मावशी नुतन आणि आजी शोभना समर्थ यांच्‍या समर्थ वारशाखाली तयार झालेल्‍या काजोल या साधारण शरीर यष्‍टीच्‍या तरुणीने 'बेखुदी'च्‍या माध्‍यमातून जेव्‍हा बॉलीवूडमध्‍ये प्रवेश केला तेव्‍हा तिच्‍या पदरी पडली साफ निराशा. चित्रपट दणकून आपटला. आणि असे वाटायला लागले की समर्थ घराण्‍याच्‍या चौथ्‍या पिढीचे बॉलीवूडमध्‍ये वासे फिरले. काजोल दिसायला सर्वसामान्‍य तरुणींसारखीच सामान्‍य. डोळयांवरच्‍या भुवया एकमेकांना जोडलेल्‍या. जिथे पापण्‍यांच्‍या केसांपासून पायातल्‍या सॅन्‍डलसाठीही स्‍पेशालीस्‍टचा सल्‍ला घेण्‍याची पध्‍दत आहे.
webdunia
IFM
तिथे चेह-याच्‍या सुंदरतेकडेही नवख्‍या काजोलचे लक्ष नव्‍हते. त्‍यामुळे ती फारशी कुणाच्‍या लक्षात राहिली नाही. मात्र तिची हीच स्‍टाईल तिचा 'एसेट' ठरली. 'बाजीगर'मध्‍ये नवख्‍या शाहरुख सोबत आपल्‍या अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्‍थान पक्‍के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले. शाहरुखच्‍या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्‍ट्री हा देखिल महत्‍वाचा विषय म्‍हटला पाहिजे.

शोमू मुखर्जी आणि तनूजा यांची कन्‍या असलेल्‍या काजोलचा जन्‍म 5 ऑगस्‍ट 1975 रोजी झाला. 'बेखुदी' या चित्रपटातील राधिका हे पात्र रंगवित काजोल चित्रसृष्‍टीत आली. हा चित्रपट चालला नाही. मात्र त्‍यानंतरच्‍या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्‍लेखनीय भुमिका केल्‍या. त्‍यात हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले... मधली सिमरन असो किंवा 'गुप्‍त'मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली.

त्‍यानंतर तिने शाहरूख सोबत करण- अर्जुन (1994), दिलवाले दुल्‍हनिया ले जायेंगे (1995), कुछ कुद होता है (1998) आणि कभी खुशी कभी गम (2001) यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्‍यातील 'दिलवाले...'मध्‍ये आज 12 वर्षांनंतरही जोरदार गर्दी खेचण्‍याची क्षमता आहे. या चित्रपटानेच तिला पहिल्‍यांदा उत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा फिल्‍मफेअर पुरस्‍कारही मिळवून दिला.

बॉलीवूडमध्‍ये राज्‍य करीत असतानाच २४ फरवरी 1999 रोजी तिने आपला प्रियकर आणि अभिनेता अजय देवगन सोबत लग्‍न केले. या दाम्‍पत्‍याला न्यासा नावाची एक चिमुरडीही आहे.

webdunia
IFM
बॉलीवूडमध्‍ये लग्‍न झालेल्‍या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्‍याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्‍नानंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्‍वी चित्रपट केले. त्‍यात कभी खुशी कभी गम (2001) या हीट चित्रपटाचाही समावेश आहे. तया चित्रपटासाठी तिला उत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्‍कार मिळाले. तर तिसरा फिल्‍मफेअर पुरस्‍कारही पटकाविला. किंबहुना लग्‍नापूर्वी अपयशी ठरलेल्‍या अजयच्‍या आजच्‍या यशातही काजोल मागील सच्‍ची जीवनसंगीनीच कारणीभूत आहे.

नुकतीच मि.पर्फेक्‍ट आमीर खान सोबत तिने 'फना' हा तर पती अजय सोबत 'यु मी और हम' हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्‍या 'ओम शाती ओम'मध्‍ये आपल्‍या नृत्‍याचे जलवे दाखविले. सध्‍या तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्‍यवसायातही पाउल टाकले आहे. त्‍यातही तिला चांगले यश मिळत आहे. या अभिनेत्रीच्‍या भावी आयुष्‍यासाठी अनेक शुभेच्‍छा...!

काजोलचे आजवरचे चित्रपट

Share this Story:

Follow Webdunia marathi