Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामाजिक चित्रपटाचे महर्षी

सामाजिक चित्रपटाचे महर्षी

वेबदुनिया

IFMIFM
प्रसिध्द चित्रपट निर्माता- दिग्दर्शक बलदेवराज चोप्रा उर्फ बी.आर. चोप्रा हे बर्‍याच दिवसापासून मृत्युशी झुंज देत होते. यात अखेर आज सकाळी मृत्यु विजयी होऊन त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यु समयी ते 94 वर्षाचे होते.

बलदेवराज यांना संपूर्ण चित्रपट सृष्टी बी.आर. चोप्रा नावानेच ओळखत होती. बी.आर. चोप्रा यांच्या प्रत्येक चित्रपटातून सामाजिक उद्‍बोधन केले जात होते. त्याचे चित्रपट मनोरंजनाने ओतप्रोत भरलेले असायचे, कारण त्यांचे असे मत होते की, मोठ्या संख्येने नागरिकांनी चि‍त्रपट पहावा आणि त्यातील सामाजिक संदेश आत्मसात करावा. आपला सिध्दांता न मोडता सामजिक विषयाना वाहिलेले चित्रपट त्यांनी निर्माण केले.

94 वर्षाचे असतादा देखील ते आजच्या बनलेल्या चित्रपटाशी परिचित होते. प्रेक्षकांचे मानसशास्त्र ते चांगल्या प्रकारे जाणून होते.
दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बी.आर.चोप्रा यांचा नातू अमेरिकामध्ये दिग्दर्शनाचा कोर्स करत होता. तेव्हा त्याला लघु चित्रपट तयार करण्याचा प्रोजेक्ट मिळाला. त्याने कथा त्याच्या आईला ऐकवली. बी.आर. चोप्रा यांनी ती कथा ऐकल्यानंतर सांगितले की, कथा चांगली नाही. त्यावर चि‍त्रपट तयार करू नको. नातवाला वाटले, आजोबा जुन्या विचारांचे आहे. त्याने त्यांचे न ऐकता चित्रपट तयार केला. जेव्हा निकाल आला तेव्हा त्याचा चित्रपट सगळ्यांच्या शेवटी...!

बी.आर.चोप्रा यांचा जन्म 1914 मध्ये झाला होता. त्यांचे बालपण तसे मजेतच गेले. लाहोर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात मास्टर डिग्री घेतली. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांना लोक चालते-फिरते ग्रंथालय म्हणत असत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 'फिल्म पत्रकार' म्हणून त्यांनी आपल्या करियरकडे वाटचाल सुरू केली.

1947 मधील फाळणीत जी दंगल झाली त्याची झळ बी.आर. चोप्रा यांनाही बसली. त्यात त्यांचे घर जाळण्यात आले. त्याच काळात ते लाहोरहून दिल्ली व दिल्लीहून मुंबईला आले. सुरवातीला त्यांनी ‘सिने हेराल्ड’ नावाची फिल्मी पत्रिका चालवली. चित्रपटाविषयी असलेले प्रेम त्यांना निर्माता बनण्यासाठी दिशा देणारे ठरले.
  एक पत्रकार ज्याप्रमाणे त्याच्या लेखणीतून समाजात जागरूकता निर्माण करतो. अगदी त्याच प्रकारचे कार्य चित्रपटाच्या माध्यमातून बी.आर. चोप्रा यानी केले      

''एक पत्रकार ज्याप्रमाणे त्याच्या लेखणीतून समाजात जागरूकता निर्माण करतो. अगदी त्याच प्रकारचे कार्य चित्रपटाच्या माध्यमातून बी.आर. चोप्रा यानी केले.'' 1951 मध्ये अशोक कुमार सोबत त्यांनी ‘अफसाना’ नावाचा पहिला चित्रपट निर्माण केला. चित्रपट हिट झाल्यानंतर बी.आर.चोप्रा यांनी विविध सामाजिक विषय चित्रपटात आणले.

1956 मध्ये त्यांनी विधवाच्या पुनर्विवाहावर आधारित ‘एक ही रास्ता’ बनवला. त्याला ही खूप प्रशंसा मिळाली. बी.आर. फिल्म्स या नावाने त्यांनी स्वत:चे बॅनर स्थापित केले. त्या बॅनरखाली त्यांचा 1957मध्ये ‘नया दौर’ आला. त्याने त्यांच्या करियरला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली.

न्यायालयातील होणार्‍या घटना हुभेहुब बी.आर. चोप्रा यांनी आपल्या चित्रपटात सादर केल्या. त्यांच्या ‘कानून’ मध्ये कोर्ट ड्रामाचे जिवंत चित्रण प्रस्तुत केले आहे. गुमराह, इत्तेफाक व धुँध उनकी संस्पेंस व थ्रिलर चित्रपट आहे. बी.आर. चोप्रा यांनी 'गीत नसलेले चित्रपट' तयार करण्याची कल्पना उद्यास आणली.
  एक पत्रकार ज्याप्रमाणे त्याच्या लेखणीतून समाजात जागरूकता निर्माण करतो. अगदी त्याच प्रकारचे कार्य चित्रपटाच्या माध्यमातून बी.आर. चोप्रा यानी केले      


गुमराह (1963), हमराज (1967), दास्तान (1972), धुँध (1973), इंसाफ का तराजू (1989), निकाह (1982), तवायफ (1985), अवाम (1987) आदी वेगवेगळ्या विषयांवर आधारीत चित्रपट बॉक्स ऑफिस झळकली.

सामजिक विषयावरचे अतिशय गंभीर चित्रपट तयार करतात, असे त्यांची पत्‍नी त्यांना नेहमी म्हणत असे. त्यावर त्यांनी 1980 मध्ये ‘पती पत्‍नी और वो’ हा हास्य चित्रपट तयार केला. ‘कल की आवाज’ (1992) हा त्यांचा दिग्दर्शित शेवटचा चि‍त्रपट होता. बी.आर. चोप्रा यांनी लिहिलेल्या कथेवर त्यांचा मुलगा रवी चोप्राने 2003 मध्ये ‘बागबान’ हा कौटुंबिक चित्रपट तयार काढला.

छोट्या पडद्यावरील त्यांच्या ‘महाभारत’ ह्या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना श्रीरामाचे दर्शन घडविले. 'महाभारत' ही मालिका आठवड्याच्या रविवारी दुरदर्शनवर यायची. मालिकेच्या दरम्यान भारतात सर्वत्र सुन्न वातावरण निर्माण व्हायचे. सगळे लोक महाभारत पाहण्यासाठी आपाआपल्या घरात राहायचे. बी. आर. बॅनलखाली त्यांनी टीव्हीवर अनेक कार्यक्रम दाखविले.

बी.आर. चोप्रा यांनी कार्याला आधी प्राधान्य दिले. म्हणून त्यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटाच्या सुरूवातीला प्रेक्षकांना 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥' हा श्लोक ऐकायला येतो. महान कर्मनायकाला भावपूर्ण श्रद्धांजली...!

Share this Story:

Follow Webdunia marathi