Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

3 इडियटसचा उत्पन्नाचा विक्रम

3 इडियटसचा उत्पन्नाचा विक्रम

वेबदुनिया

, मंगळवार, 5 जानेवारी 2010 (16:33 IST)
IFM
IFM
आमिर खानच्या थ्री इडियट्सने उत्पन्नाचे नवनवीन विक्रम केले आहेत. दहा दिवसांनंतरही चित्रपटाची गर्दी कमी झालेली नाही. संपूर्ण देशभर हा चित्रपट गर्दी खेचतो आहे. देशाच्या सर्व दिशांना चित्रपटाने यशस्वीतेचा झेंडा रोवला आहे.

हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वांत यशस्वी चित्रपटात आता 'थ्री इडियट्स'चे नाव घेता येईल. आमिर खानच्या करीयरमधील हा सर्वांत यशस्वी चित्रपट आहे. राजकुमार हिराणीच्या लगे रहो मुन्नाभाईपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात केली आहे. २००९ मध्ये यशस्वी झालेल्या चित्रपटांनी जी कमाई केली त्यापेक्षा जास्त कमाई या एकट्या चित्रपटाकडून होईल, असे संकेत आहेत.

देशभर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ८० कोटीचा व्यवसाय केला. त्यात ४५ कोटी कमावले. दुसर्‍या आठवड्यातल्या तीनच दिवसांत ३४ कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ दहा दिवसात ११४ कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. गझनीच्या एकूण व्यवसायाशी या चित्रपटाने बरोबरी केली आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करेल याचा अंदाज बॉलीवूडशी निगडीत मंडळी बांधू लागली आहेत.

दुसरीकडे या चित्रपटाच्या यशाचा जबरदस्त फटका बाकीच्या चित्रपटांना बसला आहे. एक जानेवारीला प्रदर्शित 'एक्सीडेंट ऑन हिल रोड', बोलो राम, रात गई बात गई व झूठा प्यार (डब) हे चित्रपट पार आपटले आहेत. पहिल्याच दिवशी ते फ्लॉप ठरले असे म्हणायला हरकत नाही.

त्यातल्या त्यात अवतार मात्र दुसर्‍या आठवड्यातही चालतो आहे. रॉकेटसिंह अनेक सिनेमागृहातून बाहेर पडला आहे. तर पा त्या मार्गावर आहे.

आठवड्यातील टॉप पाच चित्रपट
) 3 इडियट्स (पहिला आठवडा)
2) अवतार (दूसरा आठवडा)
3) पा (चौथा आठवडा)
4) रॉकेटसिंह (तिसरा आठवडा)
5) 2012 (सातवा आठवडा)

Share this Story:

Follow Webdunia marathi