जगात प्रत्येक क्षेत्रात्र अंधश्रद्धाळू लोकं असतात. बॉलीवूडही त्यापासून सुटलेलं नाही. पाहू येथील कोणते मोठे मोठे स्टार अंधश्रद्धेत गुरफटलेले आहेत.
अमिताभ बच्चन
सर्वात आधी जाणून घेऊ या बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन बद्दल. बिग बी भारताचा कुठला ही क्रिकेट सामना लाइव्ह बघतं नाही. त्यांना असे वाटतं की त्यांच्या सामना बघण्याने भारताचा पराभव होतो. त्यांचा परिवार सामना बघत असताना ते दुसर्या खोलीत बसतात आणि अधून- मधून स्कोअर विचारतात.
याव्यतिरिक्त एका काळावधीत ते आर्थिक संकटात होते. तेव्हा ज्योतिषांच्या सल्ला ऐकून त्यांनी काही अंगठ्या घालायला सुरू केल्या आणि भाग्य पालटलं. तेव्हापासून या अंगठ्यांवर त्यांचा विश्वास अधिक वाढत गेला.
कित्येकदा लोकांनी त्यांना दोन्ही हातात घड्याळ लावतानाही बघितले आहेत. यावर ते म्हणतात की एका हातात ते अभिषेकसाठी घडी बांधतात.
शाहरूख खान
ट्रिपल फाइव म्हणजे 555 नंबर शाहरूख स्वत:साठी लकी मानतात. शाहरुखच्या कारचा नंबर देखील हाच असतो. येवढंच नाही तर त्याच्या फोन नंबरचे शेवटले अंकदेखील 555 आहेत.
सलमान खान
सलमान खानचं करिअर जेव्हा पटरीवरून उतरलं होतं तेव्हा त्याच्या वडलांनी त्याला निळ्या स्टोनचे ब्रेसलेट दिले होते। सलमानने हे ब्रेसलेट घातलं आणि त्याचे चित्रपट गाजू लागले. यानंतर त्यानी कधीचं हे ब्रेसलेट आपल्या हातून काढले नाही.
आमीर खान
आमीर खानला असं वाटतं की त्याचे चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी रिलीज झाल्यावर नवीन रिकॉर्ड बनतं. म्हणूनच आमीर आपले चित्रपट ख्रिसमसच्या जवळपास रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतो.
अक्षय कुमार
अक्षय कुमार आपले चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी परदेशी चालला जातो. त्याला असे वाटतं की प्रदर्शनावेळी तो भारतात असला तर ते चित्रपट फ्लॉप होऊन जातं.