Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजय देवगण

अभिनयातील 'देवगण'

अजय देवगण

मनोज पोलादे

जन्म- 2 एप्रिल १९६७, मुंबई.
पदार्पण- फूल और काँटे (1991)

सध्या चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या बाबतीत अनेक राक्षसगण (लाक्षणिक अर्थाने) असताना अजय 'देवगण' लक्ष वेधून घेतो. अजय अभिनेत्यांच्या शर्यतीत लंबी रेस का घोडा आहे. त्याच्या भूमिकांकडे पाहिले तरी त्यातील वैविध्य लक्षात येईल. 'हम दिल दे चुके सनम' मधील संवेदनशील पती, 'दिवानगी' मधील स्प्लिट पर्सनॅलिटीचा तरूण, लिजेड ऑफ भगतसिंग' मधील देशभक्त भगतसिंग, 'रेनकोट' मधला गोंधळलेला, असहाय बेरोजगार तरूण, 'कंपनी' मधील गँगस्टर आणि 'ओमकारा' मधील संशयाच्या भोवर्‍यात सापडलेला नायक. दिसायला सुंदर नसणारा, वर्णाने सावळा, धिप्पाड म्हणावी अशी देहयष्टी नाही. असा हा तरूण हिंदी चित्रपटाचा नायक होऊ शकतो, असे सांगितले तर ते खरे वाटले नसते. पण हे घडलं खरं.

अजयचं शिक्षणं मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून झालं. त्याचे वडिल वीरू देवगण हिंदी सिनेमातले 'फाईट मास्टर' म्हणून प्रसिद्ध आहेत. साहजिकच अजयचे या क्षेत्रातील पदार्पण 'फूल और काँटे' या चित्रपटातून अँक्शन हिरो म्हणून झाले. दोन बाईकवर उभे राहून त्याची काँलेजमधील 'एन्ट्री' दाद मिळवून गेली. पहिलाच चित्रपट सूपरहीट झाला आणि अजय स्टार. सुरूवातीच्या काळात स्टंट, अँक्शनपट केल्यानंतर अजयचा प्रवास गंभीर अभिनयाकडे सुरू झाला.

महेश भट्ट यांनी त्याच्यातील गुण खर्‍या अर्थाने ओळखले. यातूनच त्याला 'जख्म' या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिका मिळाली. त्याने त्या संधीचे सोने करीत उत्कृष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. त्यानंतर अजयच्या अभिनयाला वाव देणारे चित्रपट आले. 'हम दिला दे चुके सनम' मध्ये सुरवातीला सलमान खान प्रभाव टाकताना नंतर अजयने अंडरप्ले करीत त्याचा संपूर्ण प्रभाव पुसून टाकला. 'कंपनी'तला त्याचा थंड रक्ताचा व भेदक डोळ्यांचा गॅंगस्टरही गाजला. 'गंगाजल'मधील पोलिस इन्स्पेक्टरही दाद मिळवून गेला. 'दिल क्या करे', 'खाकी', 'भूत' या चित्रपटांतील त्याच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या.

नुकत्याच आलेल्या ओंकारातील भूमिकाही त्याने समरसून केली. मणिरत्मनसारख्या दिग्दर्शकानेही युवामध्ये अजयला चांगली भूमिका दिली. दिवानगीतील स्प्लिट पर्सनॅलिटीची भूमिका त्याने अतिशय छान केली आहे. त्याच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हवा. भेदक डोळे व आवाज हे त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य आहे. गोलमालमधून त्याने विनोदी भूमिकाही केली. काजोल या अभिनयाची देणगी लाभलेल्या अभिनेत्रीशी तो विवाहबद्ध झाला आहे.


अजदेवगअभिनिचित्रपट : मै तूम और हम (आगामी), भूत, लंडन ड्रिम्स् (आगामी), दिवानगी, राजनिती (आगामी), हल्लाबोल (आगामी) बेनाम (आगामी), ओमकारा, जख्म, कंपनी, रेनकोट, युवा, गंगाजल लीजंड आँफ भगतसिंग हम दिल दे चूके सनम दिल क्या करे , नाजायज, प्लँटफाँर्म, ‍जिगर, फूल और काँटे


पुरस्कार :
राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (लीजंड आँफ भगतसिंग)
राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (जख्म)
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक (दिवानगी)


Share this Story:

Follow Webdunia marathi