Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसमानों में उडने की आशा...

-श्रीधर कामत

आसमानों में उडने की आशा
PRPR
आशा भोसलेंनी १९४७ मध्ये पार्श्वगायन हे व्यवसाय म्हणून स्वीकारले, त्यावेळी लता मंगेशकरांनी आपले पाय या क्षेत्रात घट्ट रोवले होते. त्यामुळेच आशाताईंना पाय रोवणे सोपे नव्हते. म्हणूनच आपले स्वरपंख विस्तारण्यापूर्वीच आशाताईंनी ठरवले होते, की दिदीची नक्कल करायची नाही. मग त्यांनी स्वतंत्र शैलीत गायन सुरू केले. हा सारा काळ संघर्षाचा होता. सुरवातीला त्यांना एक्स्ट्रा कलाकार, नर्तकी, सहनायिका यांना आपला आवाज द्यावा लागला. पण त्यातही त्यांनी वेगळेपण जपले. हळूहळू हा आवाज संगीताच्या क्षेत्रात स्थिरावला आणि नंतर तर त्याने रा्ज्य केले. हेलन यांना दिलेला आशास्वर नंतर वहिदा रहमान, नूतन, मीनाकुमारी या बड्या नायिकांचा आवाज बनला.

पार्श्वगायनाच्या साठ वर्षाच्या या सुवर्णमयी वाटचालीत आशाताईंच्या प्रतिभेनेच त्यांच्यासमोरचे अडथळे दूर केले. कठीण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि ती त्यांच्या अनुकूल होत गेली. या त्यांच्या अवस्थेशी संबंधित गाणीही आहेत. ही गाणी आजही तितकीच टवटवीत आहेत. त्यांची भावावस्था सांगणारी आहेत.

आशाताईंचा स्वर कॅबरे आणि मुजरे करणार्‍यांच्या तोंडातून काढून नायिकांच्या ओठी सजविण्याचे श्रेय जाते ठेक्यांचे बादशाह ओ. पी. नय्यर यांना. त्यांनीच आशाताईंमधील 'आशा' जागवली. शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यानंतर 'आशा' हे त्यांचे नवे फाईंड होते. त्यांनी हा स्वर असा बहरवला की हा स्वर दंतकथा बनला आहे. मदनमोहन यांचे संगीत जसे लतामय आहे, तसेच ओपींचे संगीत आशामय आहे.

बर्मन पिता-पुत्रांचेही आशाताईंच्या गुणांना पैलू पाडण्यात मोठे योगदान आहे. 'पेईंग गेस्ट' नंतर एस.डी. बर्मन यांचे लतादिदींशी वाजले. त्यानंतर मग त्यांनी आशाला निवडले. बर्मनदादांकडे आशाताईंनी अवीट गोडीची गाणी गायली. त्याचवेळी बड्या नायिकांनाही त्यांचा स्वर मिळाला. शैलेंद्रची अर्थपूर्ण गीतेही आशाताईंनी अतिशय उत्कटतेने लोकांपर्यंत पोहोचवली. 'तिसरी मंझील'नंतर आशा व आर. डी. बर्मन ही जोडी जमली. या जोडीने तर धमाल केली.

महान संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांच्याशीही लतादिदींचा वाद झाला. मग शंकर यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात गाणे दिदींनी बंद केले. म्हणूनच 'मेरा नाम जोकर' मध्ये लताचे एकही गाणे नाही. त्याचवेळी शंकर यांनी आशा यांचा आवाजाचा अतिशय योग्य वापर केला. सी. रामचंद्र (अण्णा) व लता यांची जोडी तुटल्यानंतर अण्णा संगीत क्षेत्रात फार काळ टिकू शकले नाहीत. पण 'आशा' व 'नवरंग' या चित्रपटात त्यांनी आशाताईंच्या आवाजाचा उपयोग केला. तो अतिशय प्रभावी टऱला.

त्याचवेळी रॉयल्टीच्या मुद्यावरून लता व रफी यांच्यातही काही मतभेद झाले. मग दोघांनी एकमेकांबरोबर गाणे बंद केले. सर्वच संगीतकार वैतागले. कारण लता-रफी हे युगल स्वर अजरामर समीकरण होतं. मग सगळ्या संगीतकारांनी रफी आणि आशा हे नवे समीकरण तयार केले. आशाताईंनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. आशाताईंच्या जीवनातील हा टर्निंग पॉईंट ठरला. विशेष म्हणजे रफीबरोबर सर्वाधिक गाणी आशाताईंनी गायली आहेत.

बड्या बॅनर्सपैकी बी. आर. फिल्म्सने आशाला संगीताच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी महत्त्वाची मदत केली. 'धूल का फूल' यामधून आशाची स्वरयात्रा प्रारंभ झाली. मग 'गुमराह', 'साधना', 'धर्मपुत्र', 'हमराज' व 'वक्त' या गाजलेल्या चित्रपटात आशाताईंचा स्वर आहे. बी. आर. चोपडांमुळे आशाताईंनी साहिर लुधियानवींसारख्या सिद्धहस्त कवींच्या रचना गाण्यास मिळाल्या. एन. दत्ता व रवी या संगीतकारांची गाणीही आशाताईंनी अजरामर केली.

webdunia
PRPR
'चैन से हमको कभी आपने जीने न दिया' हे गाणे म्हणजे आशाताईंच्या जीवनातील एक नाजूक जागा आहे. निष्ठूर प्रियकराला उद्देशून गायलेले हे गाणे आशाताईंनी अशा काही नजाकतीने गायले आहे, की जणू त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंत त्यात उमटलेले पहायला मिळते. कदाचित म्हणूनच ते त्यांचे आवडते गीत असावे. हे गाणे 'प्राण जाए पर वचन न जाए' या चित्रपटातील आहे. ओपी नय्यर यांचे संगीत व एस. एस. बिहारी यांचे हे गीत. या चित्रपटात आशाताईंनींच सर्व म्हणजे सहा गाणी गायली. पण नेमके हेच सर्वांत चांगले गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. या चित्रपटातील गायनाबद्दल आशाताईंना फिल्मफेअर पुरस्कार घोषित झाला. पण त्यावर्षी सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार 'पाकिजा' या चित्रपटाला न मिळाल्याबद्दल निषेध म्हणून त्यांनी हा पुरस्कार नाकारला. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाने ओपी आणि त्यांचे वाजले व ही जोडी फुटली.

अनेक संगीतकारांचे लतादिदींशिवाय पानही हलत नव्हते, त्यांनी आशाताईंनाही गायची संधी दिली. उदाहरणार्थ- - 'नदी नारे न जाओ शाम पैयाँ परुँ' (मुझे जीनेदो/ जयदेव/ साहिर), 'जब चली ठंडी हवा' (दो बदन/ रवि/शकील), 'ठंडी-ठंडी सावन की फुहार' (जागते रहो) सलील चौधुरी/ शैलेंद्र), 'अब के बरस भेज भैया को बाबुल' (बंदिनी/ एसडी बर्मन/ शैलेंद्र), 'पान खाए सैयाँ हमारो' (तीसरी कसम/ शंकर जयकिशन/ शैलेंद्र), 'झुमका गिरा रे' (मेरा साया/ मदन मोहन/ राजा मेहंदी अली खाँ), 'चाँद तू यहाँ है, और चाँद तू वहाँ' (भाभी की चूड़ियाँ/ सुधीर फड़के/ नरेंद्र शर्मा) और 'खत लिख दे साँवरिया के नाम बाबू' (आए दिन बहार के/ लक्ष्मीकांत प्यारेलाल- आनंद बक्षी).

मनमोहन यांच्याबाबतीत असे म्हटले जाते की लतादिदींबरोबर त्यांनी अतिशय सुंदर गाणी दिली. पण आशाताईंबरोबरही त्यांनी तितकीच सुमधूर गाणी दिली आहेत. उदा. 'कोई शिकवा भी नहीं' (नींद हमारी ख्वाब तुम्हारे/ राजा मेहंदी अली खाँ),'प्यार की निशानियाँ' (जेलर/ राजेंद्र कृष्ण), 'थोड़ी देर के लिए मेरे हो जाओ' (अकेली मत जइयो/मजरुह), 'सबा से ये कह दो' (बैंक मैनेजर/ जलाल मलीहाबादी), 'मोरी बाँह पकड़ लो राम' (रेलवे प्लेटफॉर्म/ साहिर) और 'अश्कों से तेरी हमने' (देख कबीरा रोया/ राजेंद्र कृष्ण) सी. रामचंद्र की धुनों पर भी आशा केस्वर ने सवार होकर गजब ढाया- 'दिल लगाकर हम ये समझे (जिंदगी और हम/ शकील), 'लहराए जिया बलखाए जिया' (शारदा/ राजेंद्र कृष्ण), 'आजा रे आजा, लागे ना मोरा जिया' (सरहद/ मजरुह), 'मैं क्यों ना नाचूँ आज कहोजी' (पैगाम/प्रदीप).

आशाताई अष्टपैलू आहेत का? नक्कीच. कारण 'हुस्न के लाखो रंग' हे मादक गीत गाणार्‍या आशाताईंनी 'तोरा मन दर्पण कहलाए' हे गाणेही तितक्याच भक्तीभावाने गायले. त्यांचा सुमधूर आवाज जडत्वातही चेतना निर्माण करणारा आहे. त्याचवेळी त्यांच्या स्वरात एक बिनधास्तपणा, अल्लडपणा यांचेही मिश्रण आहे. आणि हाच आवाज कातरही होतो.

आशाताईंची काही संस्मरणीय गाणी

जुस्तजू जिसकी थी उसको (उमरावजान/खय्याम/शहरयार)
हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम (ठाकुर जरनैलसिंह/गणेश/असद भोपाली)
तेरी और मेरी प्रीत पुरानी (चाँद और सूरज/सलील चौधुरी/शैलेंद्र)
गा मेरे मन गा (लाजवंती/एसडी बर्मन/मजरुह)
भँवरा बड़ा नादान हाए (साहब बीबी और गुलाम/हेमंत कुमार/ शकील)
दिल शाम से डूबा जाता है (संस्कार/अनिल बिस्वास/सरशार सैलानी)
आ दिल से दिल मिला ले (नवरंग/सी-रामचंद्र/भरत व्यास)
तुमको तो करोड़ों साल हुए (संबंध/ओपी नैयर/प्रदीप)
निगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है/रोशन/साहिर)
ढ़ूँढे नजर-नजर मेरा प्यार है किधर (दिल्ली का दादा/महेंद्र कपूर/एन. दत्ता/
जाँनिसार अख्तर)
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है (इजाजत/आरडी बर्मन/गुलजार)
याद तोरी आई मैं तो छम-छम रोई रे (फौलाद/जीएस कोहली/फारुख कैसर)
ये हवा ये फिजा ये समाँ (टैक्सी स्टैंड/चित्रगुप्त/मजरुह)
मन क्यों बहका री बहका
(उत्सव/लता/लक्ष्मीकांत-प्यारेलाल/वसंत देव)
ये चार दिन बहार के (रुखसाना/किशोर/सज्जाद/शकील)
प्यार नहीं छुपता छुपाने से (लाड़ला/विनोद/कैफइरफानी)
चल बादलों से आगे (एक झलक/ हेमंतकुमार/एसएच बिहारी)
ऐ जी आखिर कौन हो तुम (चालीस दिन/मुकेश/बाबुल/राजा मेहँदी अली खाँ)
हमने जलवा दिखाया तो (दिल ने फिर याद किया/मन्ना डे/ सोनिक ओमी/जीएल रावल)
सावन आए या ना आए (दिल दिया दर्द लिया/रफी/नौशाद/शकील)

Share this Story:

Follow Webdunia marathi