जन्म : 23 मार्च, 1979 जन्मस्थळ : मुंबई चित्रपट पदार्पण : फूटपाथ
चित्रपटातील अभिनयापेक्षा त्यातील चुंबनदृश्यामुळे इमरान हाशमी अधिक चर्चेत असतो. मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली व त्यानंतर चित्रपटसृष्ट्रीत पदार्पण केले. प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट यांचा तो पुतण्या आहे. 'फुटपाथ' चित्रपटात त्यांनी इमरानला अभिनयाची संधी दिली.
भूमिका पण लक्षवेधी होती. पण नंतर आलेल्या मर्डर या चित्रपटामुळे तो (आणि मल्लिका शेरावत) रात्रीत प्रसिद्ध झाले. त्याची मुख्य भूमिका असलेले 'आशिक बनाया आपने', 'कलयुग, 'गँगस्टर', 'चॉकलेट' या चित्रपटांनी तिकीट खिडकीवर चांगला व्यवसाय केला.
IFM
या सर्व चित्रपटात असलेली हिमेश रेशमियाची गाणी ही सुद्धा चित्रपट हीट होण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे इरफानच्या यशस्वीतेत हिमेशचा वाटाही मोठा आहे. इमरानमधील अभिनेत्याला वाव देणारा चित्रपट अद्याप यायचा आहे. त्यामुळे सध्या तरी त्याची चर्चा चुंबनदृश्यासाठीच होत रहाणार.