इश्मीत ‘व्हॉइस ऑफ इंडिया’च्या अंतिम सामन्यात पोचल्यानंतर त्याच्या गावचे लुधियानातील लोक प्रचंड खुशीत होते. त्यांनी नियोजनबध्द रित्या प्रयत्न करून इश्मीतसाठी मतेही जमविली. त्यासाठी इश्मीतचे काका चरणकमलसिंह यांनी एक अभियानच चालविले होते. इश्मीतच्या आवाजाचे अनेक जण दीवाणे होते आणि इश्मीतला त्याचा फायदाही मिळाला. वीस वर्ष वयाच्या या गायकाकडून त्याच्या चाहत्यांना ब-याच अपेक्षा होत्या. त्याला त्या दृष्टीने यशही मिळू लागले होते. इश्मीत कुठलेही गाणे सहज गाउ शकत होता. असे अनेकदा पाहण्यात आले आहे, की रिएलिटी शो जिंकल्यानंतर विजेत्यास भरपूर संघर्ष करावा लागतो. असे अनेक विजेते यापूर्वी विस्मरणात गेले आहेत. मात्र इश्मीत त्यात लकी ठरला त्याचे अनेक जणांशी बोलणे चालले होते, आणि लवकरच आपल्या आयुष्यात एक मोठी संधी चालून येणार असल्याचेही ते सांगत असे. संगीत जगतात शोक
इश्मीतच्या अकाली जाण्याचे वृत्त ज्याने कुणी ऐकले त्याचा त्यावर सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्याच्या जाण्याबददल अनेक नामांकित संगीतकार आणि गायकांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय संगीताच्या आसमंतातील एक उदयोन्मुख गायक आणि एक सुरेल आवाजाचा जादूगार आपल्यातून अकाली निघून गेला आहे. त्याच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.