कोंबड्या पकडण्यात तरबेज झाल्या मुंबईच्या मॉडेल, अभिनेत्री
चंडीगढहून जवळ-जवळ पाऊण तासाच्या अंतरावर एक गाव आहे सियालबा माजरी. गाव असले तरी त्याला आधुनिकतेचा स्पर्श झालेला आहे. गावात केबल टीव्ही, मोटर साइकल, चार चारी गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. घरेही चांगली मोठी आणि बर्यापैकी सुस्थितित दिसत होती. याच गावातील चार घरांमध्ये कश्मीरा शाह, संभावना सेठ, रोशनी चोपड़ा, मोनिका बेदी, अनमोल सिंह, रुचा गुजराती, इशिता अरुण आणि ऑशिमा स्वाहाने देसी गर्ल बनण्यासाठी तयारी चालवलेली आहे. प्रत्येक घरात दोघी-दोघी रहात होत्या. इमॅजिनवर लवकरच सुरू होणार्या देसी गर्ल या रियालिटी शोसाठी या सर्व पंजाबच्या या छोट्या गावात आल्या होत्या.मुंबईसारख्या आधुनिक शहरात अत्यंत आधुनिकतेने रहाणार्या, रोज पार्ट्यांना जाणार्या या मुलींना पंजाबच्या या गावात गावच्या मुलींच्या कपड्यांमध्ये पहाणे एक वेगळा अनुभव होता. उपस्थित पत्रकारांसाठी या सगळ्या मुलींनी कोंबड्याही पकडून दाखवल्या. काश्मीरा शाह कोंबड्या पकडण्यात तरबेज दिसत होती तर अनमोलला एकही कोंबडी पकड़ता आली नव्हती. काश्मीरा शाह ने वेबदुनियाशी बोलताना सांगितले, मी आयुष्यात कधी कोंबडीला हात लावला नव्हता परंतु या शोच्या निमित्ताने मला कोंबडी पकडावी लागली. आता मी यात चांगलीच तरबेज झाली आहे. आता तरी मी या बंदिस्त जागेत कोंबडी पकड़ली आहे परंतु मला विश्वास आहे की मी मोकळ्या मैदानातही कोंबडी पकडू शकेन.बीबीसी वर्ल्डवाइड प्रोडक्शंस इंडियाद्वारा इमॅजिन वाहिनीसाठी या देसी गर्लची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून युनिट या गावात शूटिंग करीत असून आणखी २० दिवस येथे शूटिंग केले जाणार आहे. बीबीसी ने यापूर्वी इमॅजिनसाठी पति पत्नी और वह सारखा एक वेगळा कार्यक्रम सादर केला होता. देसी गर्लमध्ये भाग घेणार्या या मुलींना गावातील मुलींप्रमाणेच रहावे लागणार आहे. पहाटे उठून दूध काढण्यापासून ते शेण गोळा करण्यापर्यंतचे काम त्यांना करायचे आहे. प्रत्येक आठवड्याला गावकरी एका मुलीला गावनिकाला म्हणजेच गावातून बाहेर काढणार आहेत. शेवटपर्यंत जी मुलगी राहील तिला देसी गर्लचा खिताब दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित रॉय करीत आहे. रोहितने सांगितले, या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट मला खूपच आवडला आणि ८ मुलींबरोबर गावात रहाण्याची संधी मिळत असल्याने मी लगेच होकार दिला.
संभावना सेठने सांगितले, मी पहिल्या दिवशी येथे आले तेव्हा येथील वातावरण पाहून मला वाटल नाही की मी येथे जास्त दिवस राहीन परंतु मी येथे टिकून आहे. मी पंजाबी बोलायलाही शिकले आहे. माझ्या घरातील मंडळी आज माझ्यावर खुश आहेत. त्यांना वाटते की मी आता सुधारीन. येथे सगळे चांगले आहे परंतु शेण गोळा करण्याचे काम मी कधी विसरणार नाही. मी कधी शेणाला हात लावेन असे मला वाटलेही नव्हती. पहिल्यांदा जेव्हा शेण गोळा केले तेव्हा दोन दिवस हाताचा वास गेला नाही आणि मी दोन दिवस जेवलेही नाही.इमॅजिनचे कार्पोरेट कॉम हेड निखिल मधोकने सांगितले, या शोसाठी आम्ही महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाबमधील अनेक गावांची रेकी केली. हे गाव आम्हाला आवडले कारण प्रेक्षकांनी चित्रपटामध्ये जे पंजाबी गाव पाहिलेले आहे तसेच हे गाव आहे. म्हणूनच आम्ही याची निवड केली. शोमध्ये भाग घेणार्या या सगळ्या मुलींनी जीवनात आजवर जी कामे केली नाहीत ती त्यांना येथे करावी लागत आहेत. जेवण बनवणे तर आहेच, परंतु लेट नाइट पार्ट्या करणार्या या मुलींना पहाटे चार वाजता उठावे लागत आहे. गाईचे दूध काढणे, शेण गोळा करणे, गुरे राखणे याबरोबरच शेतातही काम करावे लागत आहे. प्रेक्षकांना मुंबईच्या या आधुनिक मुलींचे रूप नक्कीच आवडेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित रॉय करीत आहे. रोहितने सांगितले, या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट मला खूपच आवडला आणि ८ मुलींबरोबर गावात रहाण्याची संधी मिळत असल्याने मी लगेच होकार दिला. हा खूपच वेगळा कार्यक्रम आहे जो प्रेक्षकांनाही आवडेल.