IFM |
विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्याला तिचे दात पसंत नाहीत. तिचे म्हणणे आहे की, ते गरजेपेक्षा जास्त मोठे आहे. असे असले तरी ती हास्य करताना ते कधीच झाकले जात नाहीत. हॉलिवूडची हॉट नायिका जूलिया राबर्टसने ऐश्वर्याला जगातील सर्वात सुंदर महिला मानले आहे.
IFM |
विश्वसुंदरी म्हणून ऐश्वर्याचे जेव्हा नाव घोषित करण्यात आले तेव्हा तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. तेव्हा तिच्या सुंदर डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. विश्वसुंदरी ऐश्वर्या तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या भेटीला गेली व डॉ. शर्मा व श्रीमती विमल शर्मा यांच्यासमोर ती नतमस्तक झाली. ती तिच्या आजी- आजोबांनाच नमस्कार करत आहे, असा तिला भास झाला होता.
IFM |
'जगातील सर्वात सेक्सी डोळे' असा किताब मिळवणार्या ऐश्वर्याने मरणोत्तर डोळे दान करण्याची घोषणा केली आहे.ऐश्वर्या मॉडेल बनण्याचे सर्व श्रेय तिच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांना देते. कारण ते तिला शिकवित कमी व तिचे छायाचित्रच जास्त काढत होते.
IFM |
एका शीतपेयाच्या जाहिरातीत एक नाजूक तरूणी अमीर खान सोबत झळकली आणि जगावर त्या नाजुक सुंदरीने संपूर्ण जगावर जादू करून टाकली. मॉडेलिंगच्या करियरच्या दरम्यान मुंबईचे फॅशन वर्ल्ड ऐश्वर्यला रॅम्पवर कॅटवॉक करताना पाहून तिच्यावर फिदा झाले होते व तिच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक होते.
IFM |
विश्वसुंदरी ऐश्वर्या मुधुबाला, नर्गिस व माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर लट्टू आहे. जरी अभिषेक बच्चनसोबत ऐशचे लग्न झाले असले तरी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज तिच्या स्वप्नातील राजकुमार आहे. ऐश्वर्याला साधे जेवण पसंत आहे. त्यात दाळ-भात व भाजी-पोळी.