Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका पदुकोण पहिल्या चित्रपटापूर्वीच स्टार

दीपिका पदुकोण पहिल्या चित्रपटापूर्वीच स्टार
IFMIFM
शाहरूख खानची नायिका बनणे हे कोणत्याही नायिकेचे स्वप्न असते. पण दीपिका पदुकोणची स्वप्नपूर्ती अतिशय सहजगत्या तीही पहिल्याच चित्रपटात झाली. फराह खानच्या ओम शांती ओममध्ये काम करत असलेल्या दीपिकाच्या चित्रपट कारकिर्दीची नांदीही याच चित्रपटाने होत आहे.

दीपिका प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची कन्या. दीपिका देखणी आहेच, त्यामुळे शाळेत असतानापासूनच दिला मॉडेलिंगच्या ऑफर येत. दीपिका एकेक ऑफऱ स्वीकारत गेली आणि आता ती या क्षेत्रातील बडी हस्ती बनली आहे.

webdunia
IFMIFM
मॉडेल झाल्यावर चित्रपटाची दारे तिच्यासाठी उघडी झाली. अनेक चित्रपटांचे प्रस्ताव तिच्यापुढे यायले लागले. पण त्यावेळी तिला यात फारसा रस नव्हता. पण एकेदिवशी तिची भेट फरहा खानशी झाली. त्यावेळी फरहाने तिला एका चित्रपटासाठी साईन करण्याची इच्छा असल्याचे सांगून या चित्रपटाचा हिरो शाहरूख खान असल्याचे सांगितले. शाहरूखचे नाव ऐकल्यावर दीपिका नाही म्हणू शकली नाही.

दीपिकाचा अद्याप एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण तरीही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. विशेषतः युवकांमध्ये तिची क्रेझ आहे. बॉलीवूडमधल्या अनेकांना वाटतेय, दीपिका उद्याची सुपरस्टार आहे.

भरतनाट्यम व कथकचे शिक्षण घेतलेल्या दीपिकाने शिक्षणही सुरू ठेवले आहे. मुक्त विद्यापीठाद्वारे ती पदवीच्या द्वितीय वर्गाचा अभ्यास करीत आहे. समाजशास्त्र व अर्थशास्त्र हे तिचे विषय आहेत.

webdunia
IFMIFM
दीपिका चित्रपटात आलेल्याला फार दिवस झाले नाहीत. पण तिच्या बाबतीत कुजबुजही सुरू झाली आहे. ती खूप गर्विष्ठ असल्याचे सांगतिले जाते. बोनी कपूरसारख्या बड्या निर्मात्याने तिला एका चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. हा एक तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. त्यासाठी मूळ तमिळ चित्रपटाचा विशेष शोही तिच्यासाठी ठेवला होता. पण दिपिकाने ऐनवेळी त्याला नकार देऊन बोनीला तोंडघशी पाडले होते, असे सांगितले जाते.

दीपिका बोनीचा प्रस्ताव आल्याचे मान्य करते, पण काही कारणांमुळे हा चित्रपट आपण करू शकलो नाही, हेही सांगते. तिला भारंभार चित्रपट करायचे नाहीयेत. पण निर्माते तिच्या मागे पडल्याने तिला नाही सांगणे भाग पडत आहे. त्यामुळेच ती गर्विष्ठ असल्याची वदंता पसरली असावी.

सध्या बॉलीवूडमध्ये नायिकांचा तुटवडा आहे. कारण बहुतेक नायिकांची वये तिशीच्या पुढे आहेत. नऊ नोव्हेंबरला 'ओम शांती ओम' प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूडला नवी नायिका मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi