Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बरेली ते बॉलीवूड- एका जिददीचा प्रवास...

बरेली ते बॉलीवूड- एका जिददीचा प्रवास...

विकास शिरपूरकर

IFM
बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीच्या रुळलेल्या वाटेवरूनच प्रियंका चोप्राने चित्रसृष्टीत प्रवेश केला. इथे प्रवेश मिळवण्यापर्यंतचे ठीक. मात्र, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करीत नाहीत तोपर्यंत प्रचंड संघर्षाची तयारी असावी लागते. हिच जिदद घेऊन या क्षेत्रात प्रवेश केलेली आणि बरेलीसारख्या छोट्याश्या शहरातून येऊन प्रियंकाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

  तमिळ चित्रपटांपासून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने ‘थामिजहन’हा पहिला चित्रपट केला. तर 2003 मध्ये ‘द हिरो’च्या रूपाने तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. वास्तविक तिने 'बिग ब्रदर'हा पहिला चित्रपट साईन केला होता. पण तो 2007 मध्ये प्रदर्शित झाला.      
झारखंडमधील जमशेदपूर शहरात 18 जुलै 1982 ला जन्माला आलेली प्रियंका आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करीत आहे. एका डॉक्टर दांपत्याच्या घरात जन्माला आलेल्या प्रियंकाचे संपूर्ण शिक्षण बरेलीच्या संत मारीया गोरेट्टी शाळेत झाले. नंतर शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. तेथून पुन्हा भारतात येऊन तिने मुंबईच्या ‘जयहिंद’ महाविद्यालयात शिक्षण घेतले. नंतर सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षण सोडून ती तयारीला लागली. तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिने 2000 साली विश्व सुंदरी पुरस्कार मिळवून आपल्यातील कौशल्याची पहिल्यांदा जगाला जाणीव करून दिली.

विश्व सुंदरी पुरस्कार मिळविल्यानंतर प्रियंका पहिल्यांदा चित्रपटात आली. तमिळ चित्रपटांपासून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने ‘थामिजहन’हा पहिला चित्रपट केला. तर 2003 मध्ये ‘द हिरो’च्या रूपाने तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. वास्तविक तिने 'बिग ब्रदर'हा पहिला चित्रपट साईन केला होता. पण तो 2007 मध्ये प्रदर्शित झाला.

अक्षयकुमार सोबत ‘अंदाज’ केल्यानंतर तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले. 'अंदाज'साठी तर तिला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. 2004 मध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार सोबत आलेल्या ‘मुझसे शादी करोंगी’या चित्रपटाने तिच्या करिअरची गाडी रुळावर आली. 2005 मध्ये अक्षय कुमार सोबतच्या ‘ऐतराज’ चित्रपटात काही हॉट सीन देऊन तिने आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. नंतर ऋतिक रोशन सोबतचा क्रिश आणि किंग खान शाहरुख सोबतचा ‘डॉन’ या चित्रपटाने चांगला गल्ला जमविल्याने प्रियंकाची स्टार व्हॅल्युही वाढविली.

  आधी हरमन बावेजा आणि नंतर शहीद कपूर सोबत तिच्‍या प्रेमाच्‍या चर्चा सुरू असल्‍या तरीही प्रियंकाने त्याचे खंडनही केलेले नाही किंवा मान्‍यही केलेले नाही. यानंतर तिचे नाव गेरार्ड सोबतही जोडले जात आहे. मात्र याबाबतचे सत्य अजून समोर यायचे आहे.      
मात्र 2007 मध्ये आलेले ‘सलाम-ए-इश्‍क’ आणि बहुप्रतिक्षित ‘बिग ब्रदर’ हे दोन्हीही चित्रपट दणकून आपटले. 2008 मध्ये तिचा ऐकेकाळचा प्रियकर हरमन बावेजा सोबतचा चित्रपट 'लव्ह स्टोरी 2050'ही प्रेक्षकांनी नाकारला. त्‍यानंतर सलमान खानसोबतचा 'गॉड़ तूस्सी ग्रेट हो, अभिषेक बच्चन सोबतचा द्रोणा यांचीही गणना पडेल चित्रपटात झाली असली तरीही प्रियंकाची वाटचाल सुरूच आहे.

अभिषेक व जॉन सोबतचा 'दोस्ताना' या थोड्याशा वेगळ्या धाडणीच्‍या चित्रपटाने ब-यापैकी गल्‍ला जमविला असला तरीही तो हीट म्हणता येणार नाही. मात्र मधुर भांडारकरच्‍या 'फॅशन'ने प्रियंकाला पुन्‍हा एकदा स्‍टार व्‍हॅल्‍यू मिळवून दिली. या चित्रपटात ती एका सुपर मॉडेलच्‍या भूमिकेत वावरली. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्‍ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्‍कारही मिळाले.

आधी हरमन बावेजा आणि नंतर शहीद कपूर सोबत तिच्‍या प्रेमाच्‍या चर्चा सुरू असल्‍या तरीही प्रियंकाने त्याचे खंडनही केलेले नाही किंवा मान्‍यही केलेले नाही. यानंतर तिचे नाव गेरार्ड सोबतही जोडले जात आहे. मात्र याबाबतचे सत्य अजून समोर यायचे आहे.

लवकरच तिचा शाहीद कपूर सोबतचा यशराज बॅनरखालील बहुप्रतिक्षित 'कमीने' येतोय या चित्रपटात दोघांची पडद्यावरील केमिस्‍ट्री छान जमली आहे. तर त्‍यानंतर विशाल भारद्वाजचा 'व्‍हॉट इज युवर राशी' आणि आशुतोष गोवारीकरचा 'प्‍यार इन्‍पॉसिबल' हे चित्रपट येणार आहेत. सध्या आघाडीच्‍या आणि व्‍यस्‍त नायिकांमध्‍ये प्रियंकाची गणना केली जाते आहे. सुंदर आणि हॉट अभिनेत्री म्हणूनही तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त 'बेवदुनिया'परिवाराकडून तिला हार्दिक शुभेच्छा!

फोटो गॅलरीसाठी येथे क्‍लीक करा

Share this Story:

Follow Webdunia marathi