Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रॉकी ते मुन्नाभाई

रॉकी ते मुन्नाभाई
IFM
बॉलीवूडमध्ये स्टारपुत्रांची काही कमी नाही. मुलांचे स्टार चमकवण्यासाठी त्याला घेऊन चित्रपट काढण्याची परंपराही नवी नाही. त्यामुळे सुनील दत्त यांनी आपल्या मुलाला घेऊन १९८१ मध्ये रॉकी चित्रपट काढला यात विशेष नाही. रॉकी यशस्वी ठरला आणि बॉलीवूडला नवा नायक मिळाला. पण या चित्रपटातून येणारा स्टार पुढे जाऊन या वादग्रस्त ठऱेल, असे कुणालाही, अगदी त्यालाही वाटले नसेल.

संजयभोवती वाद कितीही असले तरी त्याची फिल्मी कारकिर्द मात्र त्याच्या वादाबरोबरच बहरली हेही मान्य करावे लागेल.

रॉकीमधून आल्यानंतर व्यसनांनी घेरलेल्या संजयला त्याच्या वडिलांनी अमेरिकेत ठेवले. तेथून व्यसनमुक्त झाल्यानंतर पुन्हा संजय परतला. नवे चित्रपट येऊ लागले. विधाता (१९८२), नाम ((१९८६), हत्यार (१९८९), सडक (१९९१) आणि साजन ( १९९१) या चित्रपटांनी संजयला अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. केवळ स्टारपुत्र म्हणून नव्हे तर एक चांगला अभिनेता म्हणून त्याची ओळख होऊ लागली. केवळ मॅचो मॅन म्हणून नव्हे तर संवेदनशील भूमिकांसाठीही त्याचा विचार होऊ लागला.

webdunia
IFMIFM
याच काळात त्याला सुभाष घईंचा खलनायक (१९९३) हा चित्रपट आला. बॉम्बस्फोट प्रकरणही याच काळात उद्भवले. बॉम्बस्फोट कटात सहभागी असल्याचा आरोप झाल्यामुळे त्याची कारकिर्द धोक्यात आली. या वादाच्या काळातही त्याचा हा चित्रपट गाजला.

पुढे बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाल्यानंतर १८ महिने तो तुरूंगात होता. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा चित्रपटात काम करणे सुरू केले. यानंतरचे चित्रपट त्याच्यातील सशक्त अभिनेता दर्शवितात. कदाचित या संपूर्ण काळात तावून सुलाखून निघाल्यामुळे त्याच्यातील अभिनेत्यालाही पैलू पडले असावेत. महेश मांजरेकरचा वास्तव, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांनी त्याची कारकिर्द उंचीवर नेऊन ठेवली. वास्तवसाठी तर त्याला त्या वर्षातील अभिनयासाठीची सर्व पारितोषिकेही मिळाली.

हे होत असतानाच संजयने व्यावसायिक पवित्रा स्वीकारत दिग्दर्शक संजय गुप्ताच्या साथीने स्वतःची व्हाईट फिदर फिल्म्स नावाची निर्मिती संस्थाही उभारली. या संस्थेतर्फे कांटे, मुसाफिर, झिंदा या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्याचा नुकताच आलेला शूटआऊट एट लोखंडवाला हा चित्रपटही चांगलाच गाजला. आगामी काळातही त्याचे अनेक चित्रपट येत आहेत.

webdunia
IFM
संजयच्या आयुष्यात मुन्नाभाईच्या सीक्वलचा मोठा परिणाम झाला. मुन्नाभाईने लोकप्रियतेचा विक्रम करतानाच वेगळ्या पद्धतीचा सिनेमा देतानाच, निखळ मनोरंजनही केले. प्रेमळ भाई असे त्याचे रूप त्याच्या चाहत्यांनाही आवडले. लगे रहो....तील गांधीगिरी तर प्रचंड आवडली. त्याच्यामुळेच गांधीगिरी हा शब्द म्हणून रूढ झाला. त्याच्याविषयीची मते बदलण्यासाठीही हा चित्रपट त्याला उपयोगी पडला असावा. म्हणूनच तो शस्त्रास्त्र प्रकरणात दोषी ठरल्याचे कळल्यानंतर बर्‍याच लोकांना वाईट वाटले. थो़डक्यात चाहत्यांचा संजूबाबा भाईगिरीकडून गांधीगिरीकडे वळाल्याचे दिसते आहे.
वादातून बाहेर पडल्यानंतर आता संजय काहीसा प्रगल्भ झाल्यासारखा वाटतो आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा- संजय दत्त (स्लाइड शो)

Share this Story:

Follow Webdunia marathi