Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूख खानला सक्तीची विश्रांती

शाहरूख खानला सक्तीची विश्रांती

वेबदुनिया

IFMIFM
शाहरूख खान आगामी चित्रपट 'ओम शांती ओम'च्या प्रसिद्धीत गुंतला आहे. दिवाळीस प्रदर्शित होणारा हा चित्रपट चर्चेत रहावा यासाठी तो प्रयत्नात कसलीही कसर सोडण्यास तयार नाही. 'चक दे इंडिया'च्या यशानंतर ओम शांती ओम हा चित्रपटही आपल्या चाहत्यांच्या पसंतीस उतरेल याबाबत तो आशावादी आहे. या चित्रपटानंतर मात्र शाहरूखकडे एकही चित्रपट नसल्याने तो निवांत असणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत 'रोबोट' नावांचा चित्रपट तो करणार होता. त्याबाबत सर्वांना उत्सुकताही होती. शंकरने आजपर्यंत फक्त एकच हिंदी चित्रपट बनवला आहे. नायक नावाच्या त्याच्या ह्या चित्रपट अनिल कपुरने नायकाची भूमिका वठवली होती. शाहरूख व शंकर गेल्या चार महिन्यांपासून या चित्रपटावर काम करत होते, मात्र त्यांच्यात चित्रपटाबाबत काही मुद्दयावर मतभेद होते. दोघेही आपल्या विचारावर ठाम असल्याने त्यांच्यात समेट घडणे महत्कठीण होते.शेवटी व्हायचे तेच झाले. त्यांनी एकत्र चित्रपट करण्याचा मनोदय बाजूला सारला.

चित्रपट मार्गी लागला असता तर ओम शांती ओमच्या प्रदर्शनानंतर 'रोबोट'च्या चित्रीकरणास सुरूवात झाली असती. शाहरूखने त्यासाठी आगामी सात महिन्यातीच्या तारखा राखीव ठेवल्या होत्या. हा चित्रपट बंद पडला असून शाहरूखकडे इतर कोणताही चित्रपट नाही. शाहरूखला घेऊन बनवण्यात येत असलेला दिग्दर्शक राजू हिराणी व फरहान अख्तरचा डॉन-2 अगदी प्रारंभिक अवस्थेत आहेत. एकंदरीत सात महिन्यापर्यंत शाहरूखला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi