-
महेश जोशी
मला हिंदी चित्रपटात करिअर करायचे नाही. त्याऐवजी अमेरिकेतील टिव्ही मालिकेत काम करेल. अमेरिकेत काम केले तर ते जगभरात पाहचते, असे मत माजी विश्वसुंदरी डायना हेडन हिने व्यक्त केले.विमान क्षेत्राचे प्रशिक्षण देणार्या 'ऍव्हलॉन ऍकॅडमी' या संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या उद्घाटनासाठी डायना शहरात आली होती. यावेळी तिने खास वेबदुनियाशी गप्पा मारल्या. काळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचाच टॉप परिधान केलेल्या डायनाने दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तरे दिली. |
कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते. कामाबाबत आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो. जे काही कराल त्यात कौशल्य मिळवा. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर नंबर वन असणे आवश्यक आहे. |
|
|
कोणते कपडे घालावे, कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे या गोष्टी शिक्षणातून नव्हे तर समाजात वावरताना आपल्याला शिकायला मिळतात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसून भरपूर आत्मविश्वास असावा लागतो. त्याशिवाय आपण 'नंबर वन' वर असू शकत नाही, असा यशस्वीतेचा मंत्र डायनाने दिला.
१९९७ मध्ये विश्वसुंदरी ठरलेल्या डायना हेडनने हिंदी चित्रपटसृष्टीत न रमता अमेरिकेत स्थायिक होणे पसंत केले. सध्या ती लॉस एन्जिल्समध्ये राहते. डायना म्हणाली जगभरात सध्या स्पर्धा सुरू असून भारत आणि चीनमधील स्पर्धा शिगेला पोहचली आहे. विमान क्षेत्र भरभरून प्रगती करीत आहे. या क्षेत्रात महिलांना भरपूर वाव असल्याचे डायनाने सांगितले.
डायना पुढे म्हणाली कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते. कामाबाबत आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो. जे काही कराल त्यात कौशल्य मिळवा. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर नंबर वन असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ पाट्या टाकण्याची वृत्ती सोडून भरपूर मेहनीची तयारी ठेवा. मग यशाचा महामार्ग तुमचाच आहे, असा मोलाचा सल्ला तिने दिला.
'मला हिंदी चित्रपट करायचे नाहीत' असे स्पष्टपणे सांगणारी डायना अमेरिकेत मालिकांमध्ये नशीब आजमावत आहे. अमेरिकेत काही केले तर ते जगभरात पोहोचते, असे डायना मानते. यावेळी ऍड. प्रभाकर जोशी, संचालिका अर्चना अकोलकर उपस्थित होत्या.