ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया। दारी उभे स्वामीराया।
चरण तुझे पहावया। तिष्ठती अती प्रीती ॥१॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
भक्तांच्या कैवारी समर्था समर्थ तु निरधारी। समर्था समर्थ तु निरधारी।
भेट घेऊन चरणावरी। गातो आम्ही तुझी स्तुती ॥२॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा। निरंजनी तुझा ठावा।
भक्तासाठी देहभाव। तारिसी तु विश्वपती ॥३॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । स्वामी समर्थ तुजप्रती।
चरण दावी जगत्पते । स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥धृ॥
स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन। ऊठुन देई दर्शन।
स्वामीदास चरण वंदी। मागतसे भावभक्ती ॥४॥