Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाइन फ्ल्यूसाठी टॅमिफल्यूच्या २ लाख गोळया

स्वाइन फ्ल्यूसाठी टॅमिफल्यूच्या २ लाख गोळया
राज्यात विशेषत : पुणे शहरात स्वाईन फल्यूच्या तीव्र संसर्गाने, केंद्र सरकारने तातडीची योजना आखली असून या तापाच्या रुग्णांसाठी टॅमिफल्यूच्या सुमारे २ लाख गोळया मुंबईकडे रवाना केल्या आहेत. पुणे व मुंबईसाठी प्रत्येकी एक लाख गोळया दिल्या जातील.

जीटी, सेंट जॉर्ज, भगवती, राजवाडी, भाभा या रुग्णालयांमध्ये स्वाईन फल्यूच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था नव्याने करण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच कस्तुरबा रुग्णालयात संबंधित उपचाराची व्यवस्था आहे. मुंबईत १६ जणांना तर पुण्यात ४० रुग्णांना एका दिवसात लागण झाली. यामध्ये चार नवीन शाळातील विार्थ्यांचा समावेश आहे.

पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असून राज्यातील २०४ पैकी १३३ रुग्णांना पाच दिवसानंतर घरी पाठवण्यात आले. दरम्यान, स्वाईन फल्यूची बाधा शालेय विार्थ्यांनाच झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुण्यातील पालकांनी मुलांना शाळेत न पाठवल्याने विार्थी संख्या राोडावली, तर २० मोठया शाळा बंद असल्याचे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi