Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेव्हिड वॉर्नरचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

डेव्हिड वॉर्नरचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
, मंगळवार, 25 जून 2024 (16:37 IST)
टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची मोहीम संपुष्टात आल्याने डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूने खेळाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारीच ऑस्ट्रेलियन संघाचा भारताविरुद्ध सामना होता. सुपर एटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि संघ बाहेर पडला.
 
ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. अफगाणिस्तान आणि भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने आता कांगारूंना बाहेर पडावे लागले आहे. भारत आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
 
अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया बाहेर पडला असून वॉर्नरही पुढे खेळणार नाही.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची घोषणा केली.याआधी वॉर्नरने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे.
 
डेव्हिड वॉर्नरने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सलामी दिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 49 शतके आणि 19 हजार धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरचेही त्रिशतक आहे. आपल्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी  वॉर्नर यांना ओळखले जाते.

Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune Accidet Case :अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहातून सोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश