भारताने सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्ग आता कठीण झाला आहे. आता त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. डार्नी सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या 92 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर 20 षटकात 5 गडी गमावून 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या. भारताने हा सामना 24 धावांनी जिंकला.गेल्या वर्षीच्या वनडे विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला.
भारताने सुपर एटमधील तिन्ही सामने जिंकले आणि सहा गुणांसह गट एकमध्ये अव्वल स्थान पटकावले. तीन सामन्यांत दोन पराभव आणि एक विजयासह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी सकाळी अफगाणिस्तानला बांगलादेशचा सामना करायचा आहे आणि तो सामना जिंकण्यात संघ यशस्वी ठरला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास इथेच संपेल.
कोहलीने पुन्हा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला खाते न उघडताच बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या काळात रोहितने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.