Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडियाची

काय म्हणता, आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडियाची
, शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:51 IST)
आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडिया या वेबसाईटवरून घेतली गेल्याचे उघड झाले  आहे. त्यामुळे या अहवालाच्या विश्वासार्हतेवरच सवाल उठविण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर काही युजर्सनी सरकारला प्रश्न विचारला आहे. यापुढचा अहवाल काय व्हॉट्सएवर व्हायरल होणाऱ्या आकडेवारीवरून घेणार, असा खोचक प्रश्न विचारला आहे. 
 
एका वृत्तसंस्थेनुसार सर्व्हेमध्ये विकीपीडीयाशिवाय ब्लूमबर्ग, इक्रा, सीएमआयई, आयआयएम-बेंगळुरू, फोर्ब्स आणि बीएसईसारख्या खासगी संस्थांकडूनही आकडेवारी घेण्यात आली आहे. आर्थिक सर्व्हेच्या अहवालात 150 आणि 151 नंबरच्या पानावर विकीपीडियाचा उल्लेख आहे. हा उल्लेख जगाताली आघाडीच्या 100 बँकामध्ये भारतीय बँकांचा हिस्सा याच्याशी संबंधित आकड्यांमध्ये आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पनिशिंग सिग्नल यंत्रणा सुरु विनाकरण हॉर्न वाजविणे महागात पडणार