Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

60 लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा

60 लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा
, मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (11:47 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मध्यावर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरकारने अर्थसंकल्पात तरुणांना दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 60 लाख नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचेही ते म्हणाले.
 
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या दिल्या जातील. मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या येतील. रोजगाराबाबत मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हे सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकारने 60 लाख नोकऱ्यांची घोषणा करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Union Budget 2022: अर्थसंकल्पात रेल्वेला मोठी भेट, 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेन धावणार