अर्थसंकल्प 2023 ची अधिकृत तारीख आणि वेळ सरकारने जाहीर केली. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये 17 व्या लोकसभेचे 11 वे अधिवेशन 31 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. हे सत्र 6 एप्रिल 2023 पर्यंत चालणार आहे. दरम्यान 2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
वृत्तानुसार 13 फेब्रुवारी ते 13 मार्च 2023 पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (राज्यसभा आणि लोकसभा) कामकाज 13 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.