अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत असलेल्या बराक ओबामा यांच्या समारंभात नॅशनल प्रेयर सर्व्हीसमध्ये एक हिंदू महिला पुरोहितही सहभागी होणार आहे.
राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू टेम्पल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्षा डॉ. उमा म्हैसूरकर विशेष प्रार्थना सेवेंतर्गत प्रार्थनेत सहभागी होणार आहे. या प्रार्थना अमेरिकेच्या धार्मिक सहिष्णुता आणि स्वतंत्रता परंपरेचे प्रतिक असणार आहे.
स्त्री रोग विशेषज्ज्ञा डॉ.उमा या न्यूयॉर्कच्या गणेश मंदिराच्या प्रमुख आहेत. उत्तर अमेरिकेतील ते पहिले हिंदू धमिक स्थळ आहे.