अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीत किती उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत असे विचारले असता आपल्या पुढ्यात केवळ दोनच उमेदवार येतात.
रिपब्लिकन पक्षाचे जॉन मेक्कन आणि डेमोक्रेटीकचे बराक ओबामा. परंतु या निवडणुकीत एकूण 255 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.
भारता प्रमाणेच अमेरिकेतही अनेक पक्ष आहेत. यात सोशालिस्ट पार्टी, ग्रीन पार्टी आणि रिफॉर्म पार्टी प्रमाणे छोट्या पक्षांचाही समावेश आहे.
नॅशनल सोशलिस्टचे उमेदवार जॉन टायलर बॉवेल्स हेही आपले नशीब आजमावत असून, अमेरिकेवर अजुन एक हल्ला होण्याची शक्यता त्यांना आहे.
प्रोहिबिशन पार्टीने तर इराक आणि आर्थिक संकट या मुद्द्यांना बगल देत दारूवर बंदी घालण्याच्या मुद्द्याला प्राथमिकता दिली आहे. जेन एमांडसन या पक्षाचे उमेदवार आहेत.