अमेरिकी राष्ट्राध्यक्ष सर्वशक्तीशाली असतो असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बनावे असे वाटत असते.
भारतीय राज्यघटनेत ज्या प्रमाणे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनण्यासाठी काही निकष किंवा काही महत्त्वाच्या बाबी पाहिल्या जातात, त्याच प्रमाणे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.
अ) उमेदवार हा अमेरिकी नागरिक असावा.
ब) त्याने आपल्या वयाची 35 वर्ष पूर्णं केली असावीत.
क) तो सलग 14 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य करत असावा.
ड) दोनवेळा हे पद उपभोगले असेल तर तो राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही.
इ) जर राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार लायक नसेल तर तो उपराष्ट्राध्यक्षही बनू शकत नाही.
ई) त्याला इंग्रजीचे ज्ञान असावे.
या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी उभा राहणाऱ्या उमेदवारासाठीच्या महत्त्वाच्या बाबी आहेत.