अमेरीकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि निर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांनी आर्लिंग्टन राष्ट्रीय शहीद सैनिक दफनभूमीला भेट देऊन श्रध्दांजली अर्पण केली आहे. शपथविधी कार्यक्रमापूर्वी त्यांनी येथे भेट दिली आहे.
अमेरिकन पारंपरिक बिगूलच्या 'टॅप' या धूनवर या अज्ञात शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली.