जगातील सर्वांत बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची आर्थिक घडी आता विस्कटली आहे. मोठ्या कंपन्यांनी व बँकांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे. अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अमेरिकेतील या अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात राष्ट्रध्यक्षपदाची सुत्रे बराक ओबामा यांच्या हाती येत आहेत. अमेरिकेला मंदीतून बाहेर काढणे इतके मर्यादीत आव्हान त्यांच्यासमोर नाही. जागतिक स्तरावरील दहशतवाद निपटून काढणे आणि इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हेही आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या द्दष्टिने बराक ओबामा यांचे सन 2009 हे वर्ष कसे राहील हे पाहणे महत्वाचे आहे. बराक ओबामा यांची लग्न कुंडली
कुंडलीचे विश्लेषण
तृतीयेश गुरू कनिष्ठ स्थानावर आहे. परंतु, लग्नामध्ये स्वगृही शनीबरोबर राजयोग आहे. यामुळे नाव, कीर्ती आणि यश त्यांना मिळते. गुरु आणि बुध समोरासमोर असल्याने ते बुद्धिमान, विनोदी आहेत. शक्तीशाली गुरू, शनी आणि बुध त्यांना प्रतिभाशाली वकील किंवा शिक्षक बनवितो. या बुधाची लग्न आणि लग्नेशवर दृष्टी आहे, जी त्यांना चांगली वकृत्व शैली आणि वाकपटुता देते. राजकिय कुंडलीत बलवान शनी आशीर्वादासारखा असतो. बराक ओबामा यांच्या कुंडलीत शनी लग्नामध्ये आहे. यामुळे स्वच्छ चारित्र्य आणि महान नेत्याचे गुण त्यांच्यात दिसतात. पंचम स्थानात वरिष्ठ चंद्र असल्यास ते असामान्य व्यक्ती बनण्याची शक्यता अधिक आहे.
2009 मध्ये ग्रहांचा प्रभाव
25 मार्च 2009 पर्यंत बराक ओबामा यांच्या कुंडलीत गुरु, चंद्राची दशा राहणार आहे. गुरु आणि चंद्र नवपंचममध्ये असून राजयोगातही आहे. यामुळे आठ मार्च 2009 पर्यंत त्यांना प्रत्येक ठिकाणाहून सहकार्य आणि स्तुती मिळेल. परंतु, नऊ मार्च ते 18 एप्रिल हा काळ त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. त्यांची सृजनशक्ती उल्लेखनीय आहे. मात्र, ग्रहदशेमुळे ते चांगल्या- वाईट परिस्थितीचे आकलन त्या काळात योग्य प्रकारे करणार नाहीत. यावेळी निर्णय घेतांना त्यांना सतर्कता बाळगावी लागेल.
25 मार्च 2009 नंतर मंगळ आठव्या स्थानवार राहूबरोबर राहील. आठव्या स्थानावर प्लुटोही विराजमान राहणार आहे. यामुळे त्यांना कठीण परिस्थिती आणि समस्यांना समोरे जावे लागेल. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे. यावेळी त्यांचा उत्साह आणि जोष कमी होईल. या परिस्थितीत पुढे जाणे त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर दबाव वाढत जाईल. यामुळे सप्टेंबर 2009 पर्यंत ते मानसिक तणावात राहतील. या काळात त्यांना आपल्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागेल.
सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. यामुळे 11 सप्टेंबर ते 19 ऑक्टोंबर 2009 दरम्यान प्रभावशाली पावले उचलून काही महत्वाचे निर्णय ते घेतील. नोव्हेंबरच्या मध्यानंतर ते अधिक आत्मविश्वासाने कार्य करतील. यावेळी घेतलेले निर्णय त्यांची प्रतिष्ठा वाढवतील. त्याचबरोबर काही महान व्यक्ती त्यांची बाजू घेतील.