अमेरीकेत शपथ घेताना एखाद्या धर्म ग्रंथावर हात ठेवून शपथ धेतली पाहिजे अशी कुठलीही सक्ती नाही. मात्र तशी प्रथा आता रूढ झाली आहे.
शपथ घेणा-यास पुजनीय असलेल्या पुस्तकावर हात ठेवून ही शपथ घेतली जाते. शपथ देणारा आणि घेणारा यांच्यात ते पुस्तक घेऊन उभी राहते त्याची अर्धांगिनी. 1965 मध्ये सुरू झालेली ही परंपरा नंतर आजतागायत सुरू आहे. जीमी कॉर्टर आणि जॉर्ज एच.डब्ल्यु. बूश यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती. तर जॉन क्विंसी एडम्स यांनी कायद्याच्या पुस्तकावर हात ठेवून शपथ घेतली होती.
जॉर्ज डब्ल्यु. बुश यांनी 20 जानेवारी 2001 मध्ये बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती. तर वॉटर गेट कांडामुळे महाभियोगाचा सामना कराव्या लागलेल्या रिचर्ड निक्सन यांनी दोन बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती.
ओबामा मार्टीन ल्सुथर किंग यांच्या विचारांचे अनुयायी असल्याने ते मार्टीन ल्युथरच्या बायबलवर हात ठेवून शपथ घेणार आहेत. तर त्यांच्या पत्नी मिशेल हा ग्रंथ हातात धरून उभ्या राहणार आहेत.