Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिटर्न भरीत आहात, या चुका करणे टाळा

रिटर्न भरीत आहात, या चुका करणे टाळा
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (10:18 IST)
असे कधी झाले आहे का की आपण कर भरल्यानंतर आणि आयटी आर दाखल केल्यानंतर देखील आपल्याला कर भरण्यासाठी नोटीस मिळते आणि आपल्या नको असलेली ही शेवटची गोष्ट असते. गेल्या काही वर्षांपासून आयकर किंवा प्राप्तिकर रिटर्न (ITR) विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. 
 
तथापि, आपल्याला विविध तपशील भरणे आणि आयटीआर दाखल करताना विविध चरणांचे अनुसरणं करणे आवश्यक असतं, चुकीची माहिती भरणे किंवा चुका केल्या जाण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ आपण पूर्णपणे चुकीचा आयटीआर फॉर्म निवडू शकता, कोणत्याही उत्पन्नाचा उल्लेख करताना चुकू शकता, चुकीचे स्वमूल्यांकन करून चलन तपशील किंवा चुकीचे टीडीएसचे वर्णन, कर कपात खाते क्रमांक किंवा इतर कोणतेही तपशील- या सर्व कारणे मुळे आपल्याला कर सूचना किंवा नोटीस मिळू शकतात. 
 
चला सर्वप्रथम आपण करू शकत असणाऱ्या चुकांकडे बघू या आणि त्या कश्या टाळता येऊ शकतात जाणून घ्या.
 
1 चुकीचा आयटीआर फॉर्म निवडणे- 
तेच आयटीआर फॉर्म निवडा जे आपल्यासाठी लागू आहेत. सरकारने करदात्यांच्या वेगवेगळ्या वर्गांसाठी आयटीआर फॉर्म विहित केले आहे, जे त्यांच्या रहिवासी स्थितीनुसार त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत येतात, जसं करपात्र उत्पन्नाची पातळी, कंपनीमधील शेअर/ निर्देशन किंवा भागीदारी फर्म मध्ये सदस्य इ. अनेकदा करदाता या पैकी काही अटींकडे दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारे अनवधानाने चुकीचा फॉर्म निवडतात. 
म्हणूनच योग्य आयटीआर फॉर्म निवडणे फार महत्त्वाचे आहे. जर आपण चुकीच्या आयटीआर फॉर्ममध्ये आपला रिटर्न भरतात तर ते अवैध मानले जाते किंवा अजिबात दाखल मानले जात नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला विभागाकडून नोटीस मिळू शकते.
 
2 कोणत्याही उत्पन्नाचे विवरण राहिले तर - 
दुसरी सर्वात सामान्य चूक म्हणजे, जी कराची माहिती दिली जाते त्यामध्ये काही उत्पन्न दुर्लक्षित केले जाते. आपले नियोक्ता कर वजा करतात आणि आपल्याला फॉर्म 16 देतात. पण काय ते एकमेव उत्पन्न आहे. जे आपण मिळवले आहे? एका साधारण सेव्हिंग बॅलन्स मधून देखील आपल्याला व्याज मिळत ते देखील कर पात्र आहे. जरी आपली गुंतवणूक कमी असली तरीही फॉर्ममध्ये जाहीर करावी. आपल्या फॉर्म 16 मध्ये हे समाविष्ट केले गेले नसणार. कधी-कधी करदाता, विशेषतः पगारी व्यक्ती त्यांच्या नियोक्तानी जारी केलेल्या फॉर्म 16 किंवा टीडीएस प्रमाणपत्राच्या आधारे आयटीआर दाखल करतात. ते नकळत व्याज उत्पन्न सारख्या इतर उत्पन्न स्रोतांना सांगत नाही. आयटीआर फॉर्म भरतांना असे तपशील संकलित करावे आणि सांभाळून राखले पाहिजे. कर रिटर्नचे मूल्यांकन करताना प्राप्तिकर विभाग आपण दाखल न केलेल्या उत्पन्नाची दखल घेऊन आपल्याला मागणीची सूचना किंवा डिमांड नोटीस पाठवू शकतो.
 
3 जमा कर जुळत नसल्यास -
याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या रिटर्नमध्ये जे कर क्रेडिट चा दावा केला आहे आणि आयकर अधिकाऱ्यांच्या नोंदीमध्ये जी माहिती पुरविली आहे, त्यांच्या मध्ये काही फरक असू शकतो आणि  हे फरक असण्याचे कारण विविध असू शकतात.जसं की आपण चुकीची माहिती दिली असेल किंवा टीडीएस वजा करणाऱ्याने विभागाकडे माहिती सादर केली नसल्यास किंवा आपला फॉर्म 26 AS मध्ये दर्शविलेले नसेल . म्हणून कर सूचना टाळण्यासाठी फॉर्म 26AS मध्ये दर्शविलेल्या टीडीएस सह आपल्या उत्पन्ना मधून वजा केलेल्या करा ची  तपासणी करा.जर काही जुळवणी होत नसेल तर आपले कर रिटर्न करण्यापूर्वी ते दुरुस्त करण्याची खात्री करा.

4 चुकीच्या कपातीचा दावा करणे -
80 सी, 80 डी आणि 24 बी सारख्या विविध वर्गांतर्गत प्राप्तिकर कर निर्धारकांचे वेगवेगळे कर उपलब्ध आहे. ही कपात गुंतवणूक किंवा खर्चासाठी उपलब्ध आहे. या शिवाय कपाती आणि सूटची मोजणी करताना विचारात घेण्यासाठी विविध नियम आणि मर्यादा आहे. तथापि,बऱ्याच वेळा तांत्रिक ज्ञाना अभावी करदाता एकाद्या चुकीच्या कलमाखाली चुकीची रक्कम किंवा कपात असल्याचा दावा सादर करतात, ज्यामुळे त्यांच्या कर दायित्व मध्ये बदल होतो. परिणामी, कर नोटीस अनिवार्य होतात. म्हणून कपातीचा दावा करताना नियमांचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. जर आपल्याला अशा प्रकाराची समस्या येत असेल तर आपल्याला अशा परिस्थितीत कर तज्ज्ञाचा किंवा चार्टड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा.
 
5 कर रिटर्न दाखल न करणे -
 कर रिटर्न दाखलच करावयाचे नाही, जेव्हा की आपण त्या श्रेणीत बसता, त्यावेळी आपल्याला कर जमा करण्याचे नोटीस मिळू शकत. लक्षात ठेवा की आपले एकूण उत्पन्न, मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल, जसं - 60 वर्ष खालील व्यक्तीसाठी 2.5 लाख रुपये पर्यंत, 60 ते 80 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी 3 लाख रुपये आणि 80 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी 5 लाख रुपये, तर आपण आपले कर रिटर्न अवश्य दाखल करावे आणि इतर ही प्रमाण आहे जे कर रिटर्न भरण्यासाठी बंधनकारक आहे.या शिवाय, आपल्याला देय तारखेच्या पूर्वी आपले रिटर्न भरायला पाहिजे. यंदाच्या वर्षी देय तारीख कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढविण्यात आली आहे. आपण 31 मार्च 2021पर्यंत रिटर्न दाखल करू शकता, परंतु  या तारखेच्या नंतर रिटर्न दंडासह दाखल करावे लागतील. मूल्यांकन वर्ष (Assessment Year) संपल्यावर म्हणजे 31 मार्च नंतर रिटर्न्स भरता येणार नाही.शेवटच्या क्षणापर्यंत गोष्टी पुढे ढकलण्याची चूक जेव्हा आपण करतो तेव्हा जास्ती चुका होण्याची शक्यता वाढते. म्हणून,आपल्याला आपले कर रिटर्न अतिशय काळजीपूर्वक,वेळेवर आणि योग्य सल्ला घेऊनच भराव, जेणे करून कोणत्या प्रकाराची नोटीस येण्याची शक्यता नसावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CM केजरीवाल आज सिंहू सीमेला भेट देणार आहेत, ते यूटी सरकारने केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतील