Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Credit-Debit Card:क्रेडिट-डेबिट कार्ड चोरीला किंवा हरवले असेल तर त्वरित हे काम करा

Credit-Debit Card:क्रेडिट-डेबिट कार्ड चोरीला किंवा हरवले असेल तर त्वरित हे काम  करा
, सोमवार, 27 डिसेंबर 2021 (14:24 IST)
आजच्या युगात आपण तंत्रज्ञानात खूप पुढे आलो आहोत. उदाहरणार्थ, फक्त बँकिंग सेवा घ्या. लांबच लांब रांगा लावून होणारे काम आता संगणक आणि मोबाईलच्या एका क्लिकवर केले जातात. तर, पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डसारख्या सुविधा आहेत, ज्याचा लोक खूप वापर करतात. आपण डेबिट आणि क्रेडिट कार्डचा खूप वापर करतो. मात्र या मिळणाऱ्या सुविधांसह  फसवणूक करणारेही चांगलेच सक्रिय असतात. सायबर गुन्हेगार खूप सक्रिय असतात आणि लोकांच्या कष्टाचे पैसे चोरतात. अनेक वेळा लोकांचे डेबिट-क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला जातात. या प्रकरणात, नुकसान होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जर आपल्या सोबत असे घडले तर  काय केले पाहिजे आणि कोणती पावले उचलली पाहिजेत? चला तर मग जाणून घेऊया.
 
1  कार्ड ब्लॉक करा -आपले  क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरीला गेले असल्यास,  सर्वप्रथम आपले कार्ड ब्लॉक करावे. यासाठी आपण आपल्या बँकिंग अॅप ला वापरू शकता, जिथून आपण आपले गहाण झालेले किंवा चोरीला गेलेले कार्ड  त्वरित ब्लॉक करू शकता. आपण कस्टमर केअरशी बोलूनही कार्ड ब्लॉक करू शकता, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
 
2 बँकेला कळवा - कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, आपण आपल्या बँकेच्या  कस्टमर केअरशी बोलून  बँकेला कळवावे. आपले कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्याचे  त्यांना सांगावे लागेल, जेणेकरून बँकेला कळेल आणि आर्थिक नुकसान झाल्यास बँक आपल्याला मदत करू शकेल.
 
3 सर्व पासवर्ड बदला - कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास, आपण आपले सर्व पासवर्ड बदलले पाहिजेत. नेट बँकिंगपासून सर्व बँकिंग गोष्टींपर्यंत, पासवर्ड त्वरित बदलणे हा एक चांगला पर्याय आहे.
 
4 नवीन कार्डसाठी अर्ज करा-यानंतर आपण नवीन क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी देखील अर्ज करावा, कारण आपलेजुने कार्ड ब्लॉक झाले आहे. अशा परिस्थितीत, आपण वापरण्यासाठी बँकेकडून बनवलेले दुसरे कार्ड घ्या, जे काही दिवसांत बनून मिळेल.
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Australian Open: राफेल नडालला कोरोनाची लागण झाली असूनही या स्पर्धेत खेळणार ?