जेव्हा आपण व्हॉट्सअॅप चॅट्स फोन मधून पूर्णपणे डिलीट करण्याचा विचार करता , तेव्हा चॅट्स आपल्या फोनवरून हटवणे पुरेसे नाही. आपण अँड्रॉइड युजर्स असल्यास, Google ड्राइव्ह बॅकअप साफ करण्याचा देखील विचार केला पाहिजे, जे आता पर्यंत एन्क्रिप्ट केलेले नव्हते, म्हणजे ते Google खात्यात ऍक्सेस केले जाऊ शकतात किंवा हॅक केले जाऊ शकतात. चॅट साफ केल्याने आपल्यासाठी Google ड्राइव्ह स्टोरेजमध्ये काही जागा मोकळी होऊ शकते, जी आता 15GB पर्यंत मर्यादित आहे.लक्षात ठेवा की आपण एकदा Google ड्राइव्ह वरून आपले चॅट डिलीट केल्यावर त्या पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नसेल
आपल्या Google बॅकअपमधून WhatsApp चॅट डिस्कनेक्ट करण्यासाठी या टिप्सचे अनुसरण करा:
* आपल्या ब्राउझरवर drive.google.com वर जा. आपण मोबाईल वापरत असाल, तर डेस्कटॉप आवृत्तीवर जा.
* WhatsApp बॅकअप सिंक करण्यासाठी, आपल्या फोनवर कॉन्फिगर केलेल्या आपल्या Google ID आणि पासवर्डसह साइन इन करा.
* वरच्या उजव्या कोपऱ्यातून सेटिंग्ज निवडा जिथे आपल्याला आपले प्रोफाइल आणि अकाउंट चित्र दिसेल.
* डाव्या पॅनलवरील अॅप्स मॅनेज करून निवडा आणि WhatsApp मेसेंजर विभागात खाल पर्यंत स्क्रोल करा.
* Options वर क्लिक करा आणि Disconnect from Drive पर्याय निवडा.
* डिस्कनेक्ट प्रॉम्प्टसह पुष्टी करा.
Google Drive वरून WhatsApp बॅकअप हटवण्यासाठी:
* डाव्या पॅनलवरील बॅकअप लिंकवर क्लिक करा.
* बॅकअप फाइल निवडा.
* वरच्या उजव्या बाजूला 'डिलीट बॅकअप ' बटण निवडा.
* आपल्याला कन्फर्मेशन मेसेज मिळेल, Delete वर क्लिक करा.
Google Drive वरील चॅटब्रेकअप बंद करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
* WhatsApp उघडा.
* सेटिंग्जमध्ये जा.
* चॅट बॅकअप वर टॅप करा.
* Google ड्राइव्हवर बॅकअप निवडा.
* पर्यायांमधून Never निवडा.
आपण आपल्या फोनच्या लोकल स्टोरेजमधून चॅट देखील हटवू शकता:
* तुमच्या फोनवर, फाइल्स किंवा फाइन मॅनेजर उघडा.
* WhatsApp फोल्डरवर टॅप करा, आता आपल्याला सर्व WhatsApp सबफोल्डर्सची सूची दिसेल.
* डेटाबेस फाइल टॅप करा आणि धरून ठेवा.
* डिलीट निवडा.
गेल्या आठवड्यात, WhatsApp ने WhatsApp चॅट बॅकअपसाठी सर्वात-प्रतीक्षित एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणण्यास सुरुवात केली. अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर जगभरातील WhatsApp युजर्स साठी एन्क्रिप्शन आणले जात आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करण्यासाठी, आपण WhatsApp च्या नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा. एकदा आपण ते अपडेट केल्यानंतर, सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप उघडा आणि नंतर सूचनांचे अनुसरण करा.