Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता उमंग अ‍ॅप वर EPFO च्या नव्या सुविधेमुळे मिळणार हे फायदे

आता उमंग अ‍ॅप वर EPFO च्या नव्या सुविधेमुळे मिळणार हे फायदे
, शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (11:22 IST)
आता उमंग अ‍ॅप वर ईपीएफओ (EPFO) शी निगडित पेंशन धारकांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या नवीन सुविधे अंतर्गत कर्मचारी निवृत्ती योजनेतील (Employees Pension Scheme - EPS) सदस्य या उमंग अ‍ॅप वर कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 च्या अंतर्गत योजना प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतील. EPFO च्या नवीन योजनेतील सुमारे 5.89 कोटींनी सदस्यांना फायदा होणार आहे. 
 
या योजनेचे प्रमाणपत्र त्या सदस्यांना दिले जातात, जे आपले ईपीएफ योगदान काढून घेतात. तरी ही सेवानिवृत्ती नंतरच्या वयात पेंशनचा लाभ घेण्यासाठी एपीएफओ मध्ये त्यांची सदस्यता राखू इच्छित असतात.
 
एखादा कर्मचारी पेंशन योजनेतील निवृत्ती वेतनाचा हक्कदार तेव्हाच असतो जेव्हा तो किमान 10 वर्ष तरी EPFO चे सदस्य असेल. एखाद्या नव्या कामावर रुजू झाल्यावर योजेने चे प्रमाणपत्र हे प्रमाणित करतं की मागील निवृत्ती वेतन सेवा नव्या नियुक्तीसह दिल्या गेलेल्या पेंशन योग्य सेवेसह जोडली जावी. ज्यामुळे पेंशनचे फायदे वाढतात. 

जर आपणास देखील एपीएफओ संबंधित या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपल्याला आपल्या ईपीएफओ मध्ये एका सक्रिय युनिव्हर्सल अकाउंट नंबर(UAN)सह नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. 
 
पात्र असलेल्या सदस्यांची मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेंशन मिळविण्यासाठी देखील योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. या उमंग अ‍ॅपद्वारे योजना प्रमाणपत्र सुविधा मिळाल्यामुळे आपल्याला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरजच पडणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NEET 2020 Result : नीट परीक्षेचा रिझल्ट आज, कसा आणि कुठे पाहाल निकाल