Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी या स्टेप्स चे अनुसरणं करा

ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी या स्टेप्स चे अनुसरणं करा
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (19:26 IST)
आज देखील ऑनलाईन सरकारी कागदपत्रे बनविणे लोकांना अवघड वाटते, परंतु ह्याची योग्य माहिती मिळाल्यावर सरकारी कार्यालयाच्या लांबलचक लाइनच्या गडबडीतून निघून घरात बसून देखील कागदपत्रे बनवू शकता. या साठी काही टिप्स आहेत ज्यामुळे स्वतःचा वेळ वाचवून हे काम करू शकता. या साठीची पद्धत सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला हे करणे सोपे होईल.
 
* या कागदपत्रांची आवश्यकता असेल-
सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. रहिवाशी पुराव्यासाठी आधार कार्ड, वोटर कार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली कोणतेही ओळखपत्रे, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी स्कॅन असावे.   
या नंतर वयाच्या पुराव्यासाठी आपल्याकडे दहावीच्या वर्गातील गुणपत्रक, जन्म प्रमाणपत्र, पॅनकार्ड किंवा प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो स्कॅन केलेले असावे.  
 
ऑनलाईन लर्निंग लायसन्स साठी अर्ज कसे करावे-
 
* सर्वप्रथम parivahan.gov.in या वेबसाईट्सवर  जावे आणि  ‘Driving license-related services’ वर क्लिक करा.
 
* नंतर आपल्या राज्याची निवड करा  आणि लर्निंग लायसन्स पर्याय वर क्लिक करा.
 
* या नंतर आपल्याकडून काही तपशील विचारले जातील.  
 
* तपशील भरल्यावर एक फॉर्म समोर येईल 
 
* फॉर्म भरल्यावर फी भरावी लागेल, जी ऑनलाईन देय करावयाची आहे.
 
* या नंतर आपले दस्तऐवज, फोटो, स्वाक्षरी, अपलोड करावे.
 
* शेवटी एक स्लॉट बुक करावा लागेल, ज्या तारखेला आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स साठी चाचणी देऊ इच्छिता.  
 
* जर आपण या शिकाऊ लायसन्स च्या चाचणीत उत्तीर्ण झाला तर आपल्याला 6 महिन्याच्या वैधते सह लर्निंग लायसन्स दिले जाईल. आपण या चाचणीत अपयशी ठरल्यावर काही शुल्क देऊन पुन्हा एकदा ऑनलाईन चाचणी देण्याच्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करू शकता.  
 
* लर्निंग लायसन्स किंवा शिकाऊ परवाना मिळाल्यावर पुन्हा 6 महिन्याच्या आत पक्क्या किंवा पुष्टी परवानासाठी अर्ज करावे लागेल.  
पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. नंतर ड्रायव्हिंग चाचणीसाठी बोलविण्यात येईल. या साठी आपल्याला अधिकाऱ्यांसमोर उपलब्ध असणे आवश्यक आहे. येथे आपण दुचाकी, चारचाकी, किंवा इतर कोणत्याही वाहनासाठी अर्ज केला आहे. त्या वाहनाला अधिकाऱ्यांसमोर चालवून दाखवावे लागणार. या साठी आपल्यासह वाहन असणे अनिवार्य आहे.   
 
* आपण या चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर मोटार वाहन निरीक्षक आपल्या अर्जास पूर्ण स्वीकृती देतो. तसेच काहीच दिवसात आपल्याला वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरावती लॉकडाऊन : ‘तुम्हाला समजून नाही राहिले ना भाऊ, काऊन फिरता, काय काम आहे तुम्हाले?