Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gold Investment:सोन्यात गुंतवणूक करायचे असेल तर उत्तम पर्याय जाणून घ्या

Gold Investment:सोन्यात गुंतवणूक करायचे असेल तर उत्तम पर्याय जाणून घ्या
, मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:03 IST)
सोनं हे जगातील सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. संपूर्ण जग सोन्याच्या मागे वेड आहे. लोक त्याचा वापर पैसा म्हणून करत नाहीत, पण हा चकचकीत पिवळा धातू सर्वांना आकर्षित करतो.अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत सोन्याला महत्त्वाचे स्थान आहे. याशिवाय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला सर्वोत्तम मानले जाते.महागाई आणि इतर बाजाराचे धोके टाळण्यासाठी, सोनं  सर्वोत्तम मानले जाते.आज आम्ही आपल्याला सोन्यात गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हे सांगत आहोत,जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगला नफा मिळू शकेल.
 
1 सोन्याचे दागिने खरेदी करा- सोन्याचे दागिने किंवा भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे सुरुवातीपासूनच चांगले मानले जाते.यासाठी आपण आपल्या आवडीचे सोन्याचे दागिने ज्वेलरकडून खरेदी करा.सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचा हा एक चांगला मार्ग मानला जातो.यामध्ये,भविष्यात सोन्याची किंमत वाढल्यास आपण चांगले पैसे कमवू शकता.
 
2 सोने ईटीएफ- गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि गोल्ड म्युच्युअल फंडांद्वारेही सोन्यात गुंतवणूक करता येते. यामध्ये, सोने व्हर्च्यूव्हल स्वरूपात आहे.या मध्ये फिजिकल किंवा भौतिक सोन्यासारखाच कर लागतो. म्हणून, यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे.या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये ब्रोकरेज शुल्क समाविष्ट असतो, जे सोने ईटीएफच्या खरेदी आणि विक्रीसाठी नाममात्र शुल्क आहे.
 
3 सॉवरेन बॉन्ड -सॉवरेन बॉन्ड देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे बॉण्ड सरकारकडून जारी केले जाते. सरकार दर काही महिन्यांनी ते सादर करते. दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.अशा बॉण्ड्सला एन्कॅश करण्यासाठी कोणताही कर भरावा लागत नाही.
 
4 डिजिटल सोनं-सोन्यात गुंतवणूक करण्याच्या या पद्धतीमध्ये गुंतवणूक ऑनलाइन माध्यमातून केली जाते. डिजिटल सोन्याची लोकप्रियता खूप वेगाने वाढत आहे.यामध्ये वेगवेगळ्या वॉलेट्स आणि बँक अॅप्सद्वारे गुंतवणूक केली जाते. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक एक रुपया पासून सुरु केली जाऊ शकते.या गुंतवणूकीतील दीर्घकालीन भांडवल कॅपिटल गेन वर 4 टक्के सेस आणि सरचार्जसह परताव्यावर 20 टक्के कर लावला जातो. विशेष गोष्ट अशी आहे की जर ती 36 महिन्यांपेक्षा कमी काळ ठेवली गेली तर रिटर्नवर थेट कर लावला जात नाही.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रशियन विद्यापीठातील गोळीबारात 8 जण ठार