Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

How to Apply for Credit Card:क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असल्यास या गोष्टी जाणून घ्या

How to Apply for Credit Card:क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असल्यास या गोष्टी जाणून घ्या
, शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (16:00 IST)
आपण क्रेडिट कार्डासाठी अर्ज करत असाल तर या काही गोष्टींना लक्षात घेणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डाचे अर्ज स्वीकारण्यापूर्वी बँका अनेक गोष्टींचा विचार करतात.
 
क्रेडिट कार्ड अर्ज - क्रेडिट कार्ड आज सामान्य माणसाचा जीवनाचा एक भाग बनला आहे 
क्रेडिट कार्डाचे अनेक फायदे आहे.आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खरेदी किंवा इतर बिले देखील क्रेडिट कार्डाद्वारे देऊ  शकता.आपण क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरले असल्यास आपला क्रेडिट स्कोअर चांगला होतो.जेणे करून आपल्याला बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे होते.क्रेडिट कार्डाच्या द्वारे आपण EMI वर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.जर आपण क्रेडिट कार्डासाठी अर्ज करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी बँका अनेक गोष्टींचा विचार करते.आज आम्ही आपल्याला काही कारणे सांगत आहोत,ज्यामुळे आपले क्रेडिट कार्डाचे अर्ज फेटाळले जाऊ शकते.चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 नोकरीत वारंवार बदल करणे-
* नौकरीत वारंवार बदल करणे  हे अस्थिर करिअरची लक्षणे असतात.त्यामुळे आपण क्रेडिटकार्डासाठी अर्ज करणे योग्य नाही.
 
* जे वारंवार नौकऱ्या बदलतात त्यांना क्रेडिट कार्ड देणे धोकादायक मानले जाते.
 
2 कमी पगार असणे-
 
* बँक क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी अर्जदाराची परतफेड देण्याची क्षमता बघते.
 
* अर्जदाराचा पगार किती आहे,हे जाणून घेण्यासाठी बँक अर्जदाराकडून फॉर्म 16 किंवा वेतन स्लिप मागू शकते.
 
* जर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेत येत नसेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
 
3 मर्यादेपेक्षा जास्त करणे
 
* जर आपण पहिल्यांदा कार्ड घेत असाल तर उच्च मर्यादेच्या वर्तुळात अडकू नका.असे केल्याने आपला अर्ज रद्द होऊ शकतो.
 
* प्रथमच, बेसिक, कोणतेही वार्षिक शुल्क असणारे क्रेडिट कार्ड आपल्यासाठी योग्य असेल.
 
* आपल्या पहिल्या कार्डासह एक चांगला क्रेडिट इतिहास तयार करा आणि नंतर प्रीमियम कार्डसाठी अर्ज करा.
 
4 वाईट क्रेडिट स्कोअर असणे-
 
* खराब क्रेडिट स्कोअर हे देखील नाकारलेले क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्याचे  एक प्रमुख कारण आहे.
 
* जर आपण आपल्या कोणत्याही कर्जावर डिफॉल्ट केले असेल किंवा ईएमआयची उशीरा परतफेड केली असेल तर आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो.
 
 
5 जास्त कार्डासाठी अर्ज  करू नका-
 
*  बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) अर्जदाराचा क्रेडिट इतिहास तपासू शकतात.
 
* जरी आपण अनेक बँकांमध्ये अनेक कार्डांसाठी अर्ज केला असला तरी आपला क्रेडिट कार्डाचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लस घेतल्यानंतरही संसर्ग, नागपुरात आणखी 5 एमबीबीएस विद्यार्थी कोरोनाच्या कचाट्यात