Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
, शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (14:29 IST)
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट निघते स्मार्टफोनची तर त्यामध्ये मोबाईल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसल्यास तो मोबाईल एका डब्या प्रमाणे वाटतो. आपल्या आयुष्यात आपण कोणाला भेटलो असो किंवा नसो पण इंटरनेटमुळे आपण संपूर्ण जगाशी जोडलो गेलो आहोत आणि सध्याच्या कोरोनाच्या काळात तर ह्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. लॉकडाऊन मुळे सगळं काही थांबलं होत पण इंटरनेट आणि फोन सुरू असल्यामुळे सर्व काही सुरू होत. असं म्हणू शकतो. अशा परिस्थितीत जर आपले नेटच बंद झाले तर विचार करा की काय होणार. आपले काम बंद होतील, मुलांची सध्या सुरू असणारी ऑनलाईन क्लासेस देखील बंद होऊ शकते. आणि या सारख्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.पण जिथे समस्या असते तिथे समाधान देखील असतं.
 
चला तर मग जाणून घेऊ या अशे काही उपाय जे सोपे आहे आणि त्याच सह आपल्या नेटच्या स्पीडला देखील सुधारू शकतात.
 
* आपल्या फोनला रीस्टार्ट करा - 
जेव्हा कधी आपल्या फोनचा नेट मंद होईल, त्यावेळी आपल्यासाठी हा उपाय सोपा आहे. आपण आपले फोन बंद करू शकता. आणि इच्छा असल्यास री स्टार्ट देखील करू शकता. बऱ्याच वेळा असे केल्यानं फोन मंद असण्याची समस्या आणि नेटशी निगडित समस्या सुटते. आपण आपल्या फोनला रीस्टार्ट करून मोबाईल डेटा व्यवस्थितरीत्या काम करू शकण्यास मदत करू शकता. हाच उपाय आपण फोनच्या व्यतिरिक्त लॅपटॉप, टॅब किंवा इतर कोणत्याही डिव्हाईस सह करू शकता.
 
* फ्लाईट मोड इनेबल करा - 
नेटची स्पीड व्यवस्थित करण्यासाठी दुसरी पद्धत आहे की आपण आपल्या फोनमध्ये एयरप्लॅन मोड ऑन करून द्या. या साठी आपण सेटिंग्ज मध्ये जाऊन किंवा नोटिफिकेशन पॅनलला क्लिक करून देखील फ्लाईट मोडला फोन मध्ये इनेबल करू शकता. असं केल्यानं फोन मधील सर्व कनेक्शन काही काळासाठी कट होऊन पुन्हा रीस्टार्ट होतात. आपण काही काळ फ्लाईटमोड इनेबल करून, नंतर पुन्हा डिसेबल करू शकता. असं केल्यानं आपले मोबाईल डेटा पुन्हा व्यवस्थितरीत्या काम करू लागेल.
 
* मोबाईल डेटा ला ऑन ऑफ करा - 
एक सोपा मार्ग आहे की आपल्या मोबाईल डेटाला ऑफ आणि ऑन करणं. होय, आपल्या मोबाईलची स्पीड वाढविण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण आपल्या फोनच्या नोटिफिकेशन बार किंवा सेटिंग्ज मध्ये जाऊन आपल्या डेटा ऑप्शनला बंद करा नंतर परत सुरू करा. असं केल्यानं आपण आपल्या मोबाईल डेटा पुन्हा सुरू करू शकता.
 
* डेटा प्लान तपासा- 
सर्व उपाय करण्याच्या पूर्वी आपण हे तपासून बघा की आपले नेटचे पॅक तर संपलेले नाही. कारण बऱ्याच वेळा आपल्याला हे लक्षातच राहत नाही की आपण आपल्या नेटपॅक ला शेवटचे कधी रिचार्ज केले होते आणि त्याची वैधता कधी संपणार आहे. या शिवाय अशी शक्यता देखील असते की आपल्याला दररोजचा मिळणारा डेटा देखील संपला असेल. म्हणून देखील नेट चालविण्यास अडचण येतं असेल. असे असल्यास आपल्याला मोबाईल डेटाला सुरळीत चालविण्यासाठी त्वरितच प्लानला रिचार्ज करावे लागणार.
 
या सर्व उपायां व्यतिरिक्त आपण एक काम करू शकता की आपल्या फोन मधल्या वापरलेल्या ब्राउझर हिस्ट्रीला क्लिअर करा. असे केल्यानं आपल्यालामोबाईलच्या डेटाची स्पीड मध्ये झालेला फरक दिसून येईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या फोन मधील सर्च हिस्ट्रीला क्लिअर करतं नाही, ज्यामुळे मोबाईल डेटा व्यवस्थित चालत नाही. आपण वेळोवेळी असे केल्यास आपल्याला नेटचा वापर करण्यात काहीच अडचण येणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर