आपल्या मुलांसाठी गुंतवणुक करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. मुलांसाठी कुठे गुंतवणूक करावी या विचारात असाल तर एलआयसीच्या स्कीममध्ये पैसा गुंतवणे योग्य ठरेल. एलआयसी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान विशेष करुन मुलांसाठी आहे.
काय आहे योजना
न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लानसाठी एलआयसीने काही खास अटी ठेवल्या आहेत. एलआयसीच्या न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लानचं एकूण टर्म 25 वर्षाचं असतं. या विम्याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 0 वर्षे आहे. अर्थात न्यू बोर्न बेबी या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. विमा घेण्याचे कमाल वय 12 वर्षे आहे. येथे किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकीच्या रकमेवर मर्यादा नाही. तसेच काही अप्रिय घटनेबाबतीत प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर-पर्याय देखील उपलब्ध आहे.
पॉलिसी बद्दल खास गोष्टी
एलआयसी न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक पॉलिसीचा फायदा 0 ते 12 वर्षाचे मुलं घेऊ शकतात. पॉलिसीची मिनिमम राशी 10 हजार रुपए आणि कमाल राशी जमा करण्याची मर्यादा नाही. एलआयसी न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक पॉलिसीमध्ये प्रीमियम व्हेवर बेनिफिट राइडर-ऑप्शन देखील उपलब्ध आहे. एलआयसीच्या न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लानची एकूण मुदत 25 वर्षे आहे.
पॉलिसीचा फायदा कधी मिळतो
या प्लान अंतर्गत एलआयसी मुलांचे 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे वय झाल्यावर बेसिक सम इंश्योर्डची 20-20 टक्के रक्कम देते. उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिलं जातं. यासह सर्व थकित बोनस दिले जातात. पॉलिसी मॅच्योरिटीच्या वेळेस (पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकास उर्वरित विम्याच्या 40 टक्के रक्कम बोनससह मिळेल. डेथ बेनिफिट नियमांबद्दल बोलायचे तर या पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वीमा रक्कम व्यतिरिक्त निहित साधारण प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिले जाईल. डेथ बेनिफिट एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही.
एलआयसी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लानसाठी आवश्यक कागदपत्र
आपला आधार कार्ड /पॅन कार्ड आणि एड्रेस प्रूफसाठी राशन कार्ड आणि लाइट बिल
विमाधारकाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे आधीपासून आणि आत्तापर्यंतचे
विमाधारकाने अर्ज भरावा लागेल, त्याचे पालकदेखील प्रपोजल फॉर्म भरू शकतात
जर मुलाचे वय कमी असेल किंवा पॉलिसीमध्ये अंकित रक्कम जास्त असेल तर यासाठी आपण वैद्यकीय चाचणी देखील घेऊ शकता.