योग्य प्रकारे पैसे वाचवले की भविष्यासाठी कामास येतात. आपल्या स्वत:ला पैसे वाचवण्याची सवय तर हवीच सोबत कुटुंबातील इतर सदस्यांना ही सवय लावावी. योग्य तिथे खर्च करावा आणि योग्य तिथे पैसे वाचवावे. घरातील मुलांनाही लहानपणापासूनच फालतू खर्च आणि बचत याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. पैशांची बचत केल्यास भविष्यात अडचणींना सामोरा जाण्यापासून वाचता येऊ शकतं.
पैशाचे महत्त्व जाणून घ्या
सर्वांना पैशाचे महत्त्व जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कुटुंबातील सर्वांना समजावून सांगा की तुम्ही जे पैसे कमवत आहात ते फक्त सर्वांच्या भविष्यासाठी आहे आणि हे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हुशारीने आणि योग्य ठिकाणीच खर्च केले पाहिजे.
गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी थांबवावी
अनेकदा मॉल किंवा मार्केटमध्ये गेल्यावर आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो, एकीकडे यामुळे फालतू खर्च होतो, तर दुसरीकडे अशा सवयी वाईट असतात. अशा परिस्थितीत जेव्हा मुले एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करत असले किंवा आपलं ही मन उगाचच नको त्या वस्तूंकडे जात असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात काही गैर नाही.
पैसे वाचवण्याची सवय लावा
आपले पैसे आल्या आल्या खर्च होत असतील तर लहान मुलांप्रमाणेच पिगी बँक खरेदी करुन त्यात पैसे टाकण्याची सवय देखील लावू शकता. किंवा एक ठराविक दिवशी ठराविक पैसे फिक्स करण्याची सवय लावा.
प्राधान्यक्रम ठरवा
तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकत नाही. जर तुम्हाला छंद आणि गरजेपैकी एक निवडायची असेल तर प्राधान्यक्रम ठरवा.