Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: पात्रता, अर्ज प्रक्रिया ,उद्दिष्टे, लाभ, कागदपत्रे, जाणून घ्या

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: पात्रता, अर्ज प्रक्रिया ,उद्दिष्टे, लाभ, कागदपत्रे, जाणून घ्या
, सोमवार, 20 जून 2022 (22:22 IST)
Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra 2022 : महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
 
या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी अनुदान देणार आहे. आता जुन्या डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांऐवजी सौरऊर्जेवर चालणारे पंप शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. ही योजना अटल सौर कृषी पंप योजना म्हणूनही ओळखली जाते .शेतकऱ्यांना 1,00,000 सौरपंप उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून हे लक्ष्य 3 वर्षांसाठी ठेवण्यात आले आहे.
 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे-
* या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सौरपंप खरेदीवर अनुदान देणे.
* कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता.
* सिंचन क्षेत्राला वीज अनुदानाच्या ओझ्यातून मुक्त करणे.
* व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी करणे.
* प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे.
 
फायदे कोणकोणते आहेत?
 * ह्या योजनेचा फायदा घेऊन सर्व शेतकरी मित्र सौर कृषी पंपाचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून लाभ घेऊ शकतात.
* आणि ज्या शेतकरींची 5 एकर पेक्षा जास्त प्रमाणात शेती असेल अशा शेतकरींना ही योजना 5 hp तसेच 5 एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकरींना 3 hp चे पंप देखील देणार आहे.
* आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी  ह्या योजनेच्या प्रथम दितीय आणि त्रितीय टप्प्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांना महाराष्ट सरकार तब्बल 25 हजार सौर पंप वितरीत करणार आहे.आणि ही महाराष्टातील सर्व कष्टकरी शेतकरी मित्रांसाठी एक लाभदायक बाब आहे.
* आणि पर्यावरणाचे होणारे प्रदुषण थांबावे तसेच ते कमी व्हावे यासाठी जुन्या डिझेल पंपांच्या ऐवजी ह्या योजनेअंतर्गत नवीन सौर बसवुन त्या पंपांचा वापर देखील विनियोग करण्यात येणार आहे.
 
पात्रता-
* शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज जोडणी नसावी.
* सिंचनाचे साधन उपलब्ध असलेले शेतकरी.
* 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी 3 HP पंपसाठी पात्र आहेत आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन 5 HP आणि 7.5 HP पंपसाठी पात्र आहेत.
* वनविभागाच्या एनओसीमुळे गावातील शेतकऱ्यांचे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही.
* प्रलंबित ग्राहकांनी कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला.
*  दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
* ज्या शेतकर्‍यांचे यापूर्वी कोणत्याही योजनेद्वारे विद्युतीकरण झालेले नाही.
* धडक सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी 
 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी कागदपत्रे-
* आधार कार्ड
* पत्त्याचा पुरावा
* बँक खाते पासबुक
* मोबाईल नंबर: तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
* शेतीची कागदपत्रे
* पासपोर्ट आकाराचा फोटो
* ओळखपत्र
 
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
 * अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे लागेल .
* वेबसाइटच्या होम पेजवर, बेनिफिशरी सर्विसेसच्या पर्यायामध्ये Apply Online च्या पर्यायामध्ये New Consumer चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
* पुढील पृष्ठावर नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये, तुम्हाला विनंती केलेली माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल.
* नंतर तुमची कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
 
 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज स्थिती कसे चेक करायचे?
* सगळयात आधी आपणास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल मग त्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्यासमोर एक होम पेज येते.
* ह्या होम पेजवरच आपल्याला benefieciery services असे एक आँप्शन दिसुन येईल आपल्याला ह्याच आँप्शनवर क्लीक करायचे .
* त्यानंतर track application status नावाचे आँप्शन येते तिथे सुदधा आपल्याला क्लिक करायचे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधान परिषद निवडणुकीचा निकाल 'इथे' पाहा