रविवारी देशातील सर्वात मोठी परीक्षा NEET UG 2024 आहे. या परीक्षेशी संबंधित मोठी बातमी समोर अली आहे. रविवारी 5 मे रोजी ही परीक्षा होणार असून परीक्षेच्या पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्यातासात बायोब्रेक दिले जाणार नाही. बायो ब्रेक नंतर प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स केले जाईल.
परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी NTA ने NEET UG 2024 चे नियम बदलले आहे.
NEET ची परीक्षा पेनपेपरवर आधारित असून या परीक्षेसाठी भारतातील 557 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये परीक्षा केंद्र स्थापित करण्यात आले आहे.
परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होईल.
NEET UG 2024 परीक्षा देशभर आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जात आहे. परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग वापरू नये. NTA या परीक्षेसाठी प्रगत सुरक्षा उपाय आणि प्रशासकीय व्यवस्थेसह सज्ज आहे.
परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहे. यामध्ये उमेदवार आणि तपासणी कर्मचाऱ्यांसाठी मल्टिस्टेज बायोमेट्रिक प्रमाणीकरण, उड्डाण पथकांद्वारे अचानक तपासणी, उमेदवारांच्या अर्जामध्ये दिलेली माहिती तपासण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साधनांचा वापर, सखोल तपासणी पर्यवेक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवाय, परीक्षेच्या पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्या तासात कोणत्याही बायो-ब्रेकला परवानगी नाही, तसेच प्रत्येक बायो ब्रेकनंतर उमेदवाराचे बायोमेट्रिक्स देखील घेतले जातील.
शिवाय, परीक्षेच्या पहिल्या एक तासात आणि शेवटच्या अर्ध्या तासात कोणत्याही बायो-ब्रेकला परवानगी नाही, तसेच प्रत्येक बायो ब्रेकनंतर उमेदवाराचे बायोमेट्रिक्स देखील मोजले जातील.
उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र NTA च्या संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. त्याची एक छापील प्रत सोबत आणावी.
विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, आणि रोलनंबर बारकोड स्पष्ट्पणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. प्रिंटची कॉपी अस्पष्ट असल्यास प्रत पुन्हा डाउनलोड करावी. आणि चांगली प्रिंट आणावी.
जाणून घ्या नियमावली
पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास बंदी आहे. शूज आणि उंच टाचांच्या सँडलऐवजी सामान्य शूज आणि चप्पल घाला.
परीक्षेच्या ठिकाणी एक ते दीड तास आधी पोहोचावे. वेळेवर पोहोचा आणि तपास आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करा. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास गेट बंद केले जातील. यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रात अजिबात प्रवेश दिला जाणार नाही.
जर तुम्हाला धार्मिक समजुतीनुसार कपडे घालायचे असतील तर दीड ते दोन तास अगोदर पोहोचा. सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करा.
पिण्याच्या पाण्याची पारदर्शक बाटली आणू शकता.
उष्णता जास्त आहे, त्यामुळे हलके सुती कपडे घाला.
इतर विद्यार्थ्यांना मार्ग देण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर वाहने किंवा गर्दी टाळावी.