पोस्ट ऑफिस ची बचत योजनांना सुरक्षित आणि फायद्याचे रिर्टनसाठी मानले जाते. येथे बचत खाते उघडणे फायद्याचे सांगितले जाते. प्रायव्हेट बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी ग्राहकांना बर्याच सुविधा दिल्या जातात.
खाते उघडणे खूप सोपे
ज्याप्रकारे आपण खाजगी बँकेत विजिट करुन खाते उघडू शकता त्याच प्रकारे पोस्ट ऑफिसच्या ब्रांचमध्ये जाऊन खाते उघडता येतात. ब्रांचमध्ये जाऊन आपल्या अर्ज फॉर्म भरुन जमा करायचा आहे. या फॉर्मसह काही आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतात. या व्यतिरिक्त केव्हायसी देखील अनिवार्य आहे. यासह लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागतो. ग्राहक इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज फॉर्म प्राप्त करु शकतात. बचत खात्यात 500 रुपये मिनिमम बँलॅस असणे आवश्यक आहे. याहून कमी पैसे असल्यास दंड भोगावा लागतो. याच्या सेव्हिंग अकाउंटवर आपल्याला वार्षिक व्याज 4 टक्के दराने दिले जाते.
एटीएम आणि चेकबुकची सुविधा
पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंट बँकेच्या सेविंग्स अकाउंट सारखं असतं. यात आपल्याला एटीएम आणि चेकबुकची सुविधा मिळते. पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंटमध्ये 10 हजार रुपये पर्यंत व्याजवर आपल्याला टॅक्स देण्याची गरज नसते.
कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक
हे खाते उघडण्यासाठी आपल्याला आयडी प्रूफच्या रुपात मतदाता कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट इतर कागपत्रांची लागतील. या व्यतिरिक्त एड्रेस प्रूफच्या रुपात बॅकेची पासबुक, वीजेचं बिल, फोन बिल, आधार कार्ड, पासपोर्ट, राशन कार्ड वापरु शकता. सोबतच लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो देणे देखील गरजेचे आहे. तसेच ज्वाइंट खात्यासाठी सर्व संयुक्त खाताधारकांचे फोटो असेले पाहिजे.
पोस्ट ऑफिस चे फायदे
पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉजिट आणि पोस्ट ऑफिस टर्म डिपॉजिट अत्यंत लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस एमआयएस (मासिक आय योजना) केंद्र सरकारद्वारे समर्थित सुरक्षित गुंतवणूक आहे.
पोस्ट ऑफिस एमआयएस एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा समान गुंतवणूक करणारे 2 ते3 लोकांद्वारे उघडलं जातं आणि याचं कार्यकाल 5 वर्षे असतं. सिंगल अकाउंट धारक 4.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करु शकतात, जेव्हाकी संयुक्त खात्यात गुंतवणूक राशी 9 लाख रुपये पर्यंत करता येऊ शकते.
पोस्ट ऑफिस स्कीम
पोस्ट अनेक लहान बचत योजना ऑफर करते. पोस्ट ऑफिस बँकेंच्या अपेक्षा अधिक व्याज दर ग्राहकांना ऑफर करत आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, पब्लिक प्रॉविडेंट फंड (पीपीएफ), सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाई), नेशनल सेविंग सर्टिफिकेट (एनएससी), 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट, किसान विकास पत्र (केवीपी) और सीनियर सिटीजन सेविंग्स इतर सामील आहे.