Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

PAN-Aadhaar Link करण्याची तारीख वाढवली,पण ‘मोफत सेवा’ आता बंद

PAN-Aadhaar Link Date Extended
, गुरूवार, 31 मार्च 2022 (13:49 IST)
जर आपण आतापर्यंत आपल्या PAN Card ला Aadhaar शी लिंक केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही कारण आता सरकारने याची मुदत वाढवली आहे परंतु आता ‘मोफत सेवा ’ मिळणार नाही.
 
आयकर विभागाची सर्वोच्च धोरण बनवणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख पूर्ण वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे.
 
CBDT ने अधिसूचना जारी केली
सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली. नोटिफिकेशनमध्ये असे लिहिले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे.
 
पॅन काम करत राहील
सीबीडीटीच्या या नवीन व्यवस्थेनंतर ज्यांचे पॅन-कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केलेले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत राहतील. अशा प्रकारे आयकर रिटर्न भरण्यापासून ते परतावा मिळवण्यापर्यंत, ते पूर्वीप्रमाणेच वापरले जाऊ शकते.
 
मोफत सेवा संपली
आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते, मात्र आता ही 'मोफत सेवा' बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान पॅन-आधार लिंक केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तान : इम्रान खान सरकार संकटात, आता पुढे काय होणार?