Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SBI ने आपल्या ग्राहकांना ATM मध्ये होणाऱ्या फसवणुकीतून वाचण्यासाठी दिल्या काही खास टिप्स ...

SBI ने आपल्या ग्राहकांना ATM मध्ये होणाऱ्या फसवणुकीतून वाचण्यासाठी दिल्या काही खास टिप्स ...
, गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (14:45 IST)
स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) नेहमीच आपल्या ग्राहकांना सतत सुरक्षित बँकिंगचे उपाय सुचवत असते. त्यांनी ट्विटरवर एटिएम फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. यामुळे ग्राहक एटिएम फसवणुकीला टाळू शकतात. या टिप्स मध्ये बँकने सांगितले आहे की एटिएमचा वापर कसा करावयाचा आहे आणि काय-काय सावधगिरी बाळगायची आहे. चला काय आहेत त्या टिप्स जाणून घेऊ या..
 
बँकेने म्हटले आहे की एटिएम, पीओएस मशीनवर एटिएम कार्डचा वापर करताना कीपॅड झाकण्यासाठी आपल्या हाताचा वापर करावा आणि ग्राहकांना कधीही आपल्या पिन किंवा कार्डाची माहिती सामायिक करू नये. या व्यतिरिक्त आपल्या कार्डावर कधी ही आपल्या पिन लिहू नये.
webdunia
आपण आपल्या कार्डाचे तपशील किंवा पिनसाठी बँकेकडून किंवा इतर कोठून ही कोणत्याही कॉल किंवा ईमेलला उत्तर देऊ नये. आपल्या पिनमध्ये वाढदिवस, फोन किंवा खाते क्रमांक म्हणून वापरू नये.
 
बँकने काही खबरदाऱ्या सांगितल्या आहेत जसे की आपल्या ट्रांजेक्शन स्लिप(व्यवहार स्लिप)ला लांब ठेवावं आणि कोणत्याही व्यवहार (ट्रांजेक्शन) करण्यापूर्वी जासूसी(हेरगिरी) कॅमेरे शोधायला हवं. जेणेकरून आपल्या कार्डाची माहिती कळू नये. कीपॅड हाताळण्यापासून सावध असायला हवं आणि एटिएमच्या केबिन मध्ये आपल्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीपासून सावध राहावं ट्रांजेक्शन अलर्ट(व्यवहाराच्या सुचणे)साठी साइनअप सुविधा घ्या जेणेकरून आपल्या खात्यातून होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराबद्दलची माहिती आपणांस मिळू शकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय रिलायन्स ‘टिकटॉक’ची खरेदी करेल?