Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज

या बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी व्याज
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:16 IST)
सीनियर सिटीजन्स स्पेशल एफडी स्कीम मे 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. आधी याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 होती ज्याला वाढवून 31 मार्च 2021 करण्यात आली. आता याला पुढे वाढवून 30 जून 2021 करण्यात आली आहे ज्याने अधिकाधिक वरिष्ठांना याचा लाभ घेता येईल.
 
या योजनेत सीनियर सिटीजन्सला एफडीवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेते पूर्ण 1 टक्के अधिक व्याज मिळतं. आता देशातील तीन प्रमुख बँकांनी याची शेवटली तारीख 30 जून पर्यंत वाढवली आहे.
 
देशाची सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या वरिष्ठ ग्राहकांसाठी SBI WeCare एफडी स्कीम चालवली आहे. याची शेवटची तारीख 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.  
 
बँक आपल्या वरिष्ठ नागरिक ग्राहकांना एफडीवर 0.75 टक्क्याहून अधिक व्याज देत आहे. याप्रकारे SBI WeCare मध्ये 5 वर्षाच्या अवधीवर सीनियर सिटीजन्सला 6.14 टक्के व्याज मिळत आहे.
 
देशाच्या खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC ने सीनियर केयर एफडी स्कीमवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.75 टक्क्याहून अधिक व्याज देण्याचे जाहीर केले आहे. 
 
सामान्यत: वरिष्ठ नागरिकांना एफडीवर 0.50 टक्क्याहून अधिक व्याज मिळतं. HDFC बँकेने यात 0.25 टक्के अधिक जोडून अतिरिक्त व्याज देत आहे. या प्रकारे बँकची 5 वर्ष अवधी असलेल्या एफडी स्कीमवर एकूण व्याज 6.25 टक्के आहे.
 
ICICI बँकेने देखील एचडीएफसी बँकेच्या स्पर्धेत सीनियर सिटीजन्सला एफडीवर अधिक व्याज देण्याचे जाहीर केले आहे. सीनियर सिटीजन्ससाठी बँक गोल्डन इयर्स नावाने एफडी स्कीम चालवते. या योजनेसाठी ते वरिष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा 0.80 टक्क्याहून अधिक अर्थात 6.30 टक्के व्याज देत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘रुग्णालयात बेड देऊ शकत नाही तर इंजेक्शन देऊन वडिलांना मारून तरी टाका’