Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 10 January 2025
webdunia

इंटरनेटशिवाय व्हाट्स अँप चालवायचे आहे? ही युक्ती अवलंबवा

इंटरनेटशिवाय व्हाट्स अँप चालवायचे आहे?  ही युक्ती अवलंबवा
, शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (18:51 IST)
आजच्या युगात इंटरनेटवरील लोकांचे अवलंबित्व खूप वाढत आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे, ज्याचा ते खूप वापर करतात. घरून काम करण्यापासून ते बाहेरून वस्तू खरेदी करणे, बँकेत पैसे जमा करणे, बिले भरणे आदी सर्व कामे लोक घरी बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून करत आहेत. 
 
आज प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण इंटरनेटशिवाय  स्मार्टफोनवर व्हाट्सअँप , फेसबुक , टेलिग्राम सारखे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकणार नाही. यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या लोक व्हॉट्सअॅपवर बराच वेळ घालवतात.या द्वारे आपण एकमेकांशी संवाद साधता, फोटो, व्हिडीओ शेअर करता.
 
लोक व्हॉट्सअॅपशी प्रत्येक प्रकारे जोडलेले आहेत. जर आपल्या कडे इंटरनेट नसेल आणि आपल्याला व्हाट्सअँप चालवायचे असेल तर इंटरनेट शिवाय आपण हे वापरू शकत नाही. पण आम्ही आज अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण  इंटरनेटशिवाय व्हाट्सअँप चालवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
 
जर आपल्याला स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप चालवायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला चॅटसिम खरेदी करावी लागेल. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की चॅटसिम  म्हणजे काय आहे? , चॅटसिम हा एक वेगळा प्रकारचा सिम आहे, जो चॅटसिमच्या वेबसाइटवर किंवा सिमच्या दुकानात मिळेल.
 
* हे आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. हे तेच चॅटसिम आहे ज्याद्वारे आपण वर्षभर इंटरनेटशिवाय व्हाट्सअँप चालवू शकता.
 
* जर आपण या चॅटसिमबद्दल बोललो तर त्याची किंमत 1800 रुपये आहे आणि ती एका वर्षासाठी वापरली जाऊ शकते. त्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागेल.
 
* हे चॅटसिम सर्व प्रकारच्या मोबाईल फोनमध्ये लावता येते आणि आपण ते देशात आणि परदेशात सर्वत्र वापरू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद