Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5 राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर राहुल गांधींचं पहिलं वक्तव्य, काय म्हणाले ते जाणून घ्या?

5 राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर राहुल गांधींचं पहिलं वक्तव्य, काय म्हणाले ते जाणून घ्या?
, गुरूवार, 10 मार्च 2022 (16:14 IST)
Election Result 2022: यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावंं लागलं आहे. पक्ष कोणत्याही राज्यात सरकार स्थापन करताना दिसत नाहीये आणि आता या निकालावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की आम्ही जनतेचा कौल स्वीकारत आहोत. जनादेश जिंकणार्‍यांना अभिनंदन. मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू.
 
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये काँग्रेस केवळ 2 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये 18, पंजाबमध्ये 18, गोव्यात 11 आणि मणिपूरमध्ये 4 जागांवर पुढे आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता गेली आहे. येथे एकूण 117 जागांपैकी आप 92 जागा जिंकत असल्याचे दिसत आहे.
 
काँग्रेसने ट्विट केले की, "लोकशाहीत सार्वजनिक विवेक आणि सार्वजनिक व्यवस्था सर्वोपरि आहे. आजच्या आदेशाचा आदर करत आम्ही जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. महागाई, बेरोजगारी, सरकारी मालमत्तेचा लिलाव, भटकी गुरे, महिला, दलित अत्याचार आणि जनतेच्या सर्व खरे प्रश्नांवर आमचा लढा सुरूच राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर प्रदेश निकालानंतर योगी आदित्यनाथ भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झालेत का?